P.N.Patil

P. N. Patil Pass Away : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन

335 0

कोल्हापूर : काँग्रेसचे पक्षाचे कोल्हापुरातील आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी.एन. पाटील (P. N. Patil Pass Away) यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले. मृत्यूशी त्यांची सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 71 वर्षांचे होते. गांधी घराण्याच्या विश्वासू म्हणूनच आमदार पी एन पाटील यांची आयुष्यभर ओळख झाली. स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचेही खंदे समर्थक म्हणून पी.एन. पाटील यांची ओळख राहिली.

रविवारी (19 मे 2024) सकाळी चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. यानंतर त्यांना तातडीने जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. दरम्यान काही दिवसांपासून काही दिवसांपासून ते कमी रक्तदाबाच्या समस्येचाही सामना करत होते. अखेर आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

जिल्हा काँग्रेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज (23 मे) सकाळी 10 वाजता आमदार पी. एन. पाटील यांचे पार्थिव जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शन ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता त्यांचे पार्थिव मुळ गावी सडोली खालसामध्ये नेण्यात येणार आहे. सडोली खालसामध्येच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Maharashtra Rain

Maharashtra Rain : पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

Posted by - July 19, 2023 0
मुंबई : राज्यात जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण जिल्ह्याला पावसाने (Maharashtra Rain) झोडपले आहे.…

15 वर्षे भाजपच्या नगरसेवकांना पाडूनच नगरसेवक होतोय – वसंत मोरे

Posted by - April 12, 2022 0
कोरोना काळातील मनसेच्या खळ्ळखट्याकनंतर सरकारचा कारभार सुधारला. पुण्यातील माझं काम पाहून गेल्या चार पाच दिवसात अनेक पक्षांकडून ऑफर आल्या. मग…

विजय शिवतारेंचं बंड शमलं; वर्षा बंगल्यावरच्या ‘त्या’ बैठकीत नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण INSIDE STORY

Posted by - March 30, 2024 0
पुरंदर: मागील काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदार संघ आणि त्याची निवडणूक हा चर्चेचा विषय ठरला आहे. याला कारण म्हणजे अजित…

वंचित बहुजन युवा आघाडीचा 15 सप्टेंबरला समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयावर मोर्चा !

Posted by - September 14, 2022 0
पुणे – वंचित बहुजन युवा आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने विविध विद्यार्थी प्रश्नांना घेऊन समाज कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कार्यालय पुणे…
Harshvardhan Patil

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी

Posted by - March 4, 2024 0
इंदापूर : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *