Sonia And Rahul Gandhi

Congress : काँग्रेसच्या पराभवाला ‘या’ चुका ठरल्या कारणीभूत; 1980 नंतर उत्तर भारतात सत्ता मिळवण्यात पहिल्यांदाच अपयश

415 0

मुंबई : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला (Congress) मोठा पराभव पत्करावा लागला आहे. मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला विजयाची अपेक्षा होती मात्र तिकडेदेखील जनतेने त्यांना नाकारले आहे. त्यामुळे हिंदी बेल्टमधून ‘काँग्रेस’ पूर्णपणे बाहेर पडले आहे. 1980 नंतर पहिल्यांदाच उत्तर भारतात सत्ता मिळवण्यात काँग्रेसला अपयश आले आहे. चला तर मग आज आपण काँगेसच्या पराभवाची कारणे जाणून घेऊया…

1. काँग्रेस प्रचाराबाबत संभ्रमात राहिली
काँग्रेस हायकमांड, विशेषत: मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या जोडीला हिंदी पट्ट्यातील राज्यांतील निवडणुकांपूर्वी गटबाजी आटोक्यात आणता आली नाही. निवडणुकीच्या काही दिवस आधी पक्षाच्या हायकमांडने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पक्षाला प्रचाराची संपूर्ण रणनीती बदलावी लागली याचा फटका त्यांना बसला. राजस्थानमध्येही काँग्रेसला अंतर्गत गटबाजी संपवता आली नाही. अशोक गेहलोत समर्थक नेत्यांच्या अनेक जागांवर सचिन पायलट प्रचाराला गेले नाहीत. यामध्ये दानिश अबरार यांची सवाई माधोपूर आणि चेतन दुडी यांची दिंडवाना ही जागा प्रमुख आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांची कोणतीही संयुक्त रॅली काँग्रेस स्वतंत्रपणे आयोजित करू शकली नाही.

2. तिकीट वाटपात विलंब झाल्याने चुकीचा संदेश
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने निवडणुकीच्या 3 महिने आधी तिकीट जाहीर केले. परंतु काँग्रेस हायकमांड तसे करण्यात अपयशी ठरले. काँग्रेसच्या वतीने संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी पक्ष सप्टेंबरपर्यंत सर्व जागांवर तिकीट जाहीर करेल असा दावा केला होता, मात्र तो दावादेखील फोल ठरला होता. काँग्रेसमध्ये उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत तिकीट वाटपावरून जोरदार खडाजंगी झाली होती.

3. निवडणूक राज्यांमध्ये काँग्रेसची देखरेख यंत्रणा कमकुवत
निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसने वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली होती. परंतु ते संपूर्ण निवडणुकीच्या दृष्यातून गायब राहिले. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशात कमलनाथ हे नेते होते. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी हायकमांडकडून मुक्तहस्ते घेतले होते.अशोक गेहलोत आणि कमलनाथ यांच्यापेक्षा दोन्ही राज्यांत हायकमांडने नियुक्त केलेले प्रभारी खूपच कमकुवत होते. काँग्रेस हायकमांडला मध्य प्रदेशात समाजवादी पक्षासोबत युती हवी होती. पण कमलनाथ यांच्यामुळे ती होऊ शकली नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

मध्यप्रदेश, राजस्थानात काँटे की टक्कर; कल हाती यायला सुरुवात

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Telangana Election Result : महाराष्ट्र जिंकायला निघालेल्या ‘राव’ यांच्यावर तेलंगणा गमावण्याची वेळ?

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Assembly Election 2023 : तेलंगणा मिळवलं पण इतर राज्यात काँग्रेसला बसला फटका; शरद पवारांनी सांगितलं पराभवामागचे कारण

Share This News

Related Post

Narendra Modi

PM Modi : हिमाचलमधील लेपचा येथे पंतप्रधान मोदींनी जवानांसोबत दिवाळी केली साजरी

Posted by - November 12, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या आठ वर्षांप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी भारतीय लष्करातील जवानांसोबत दिवाळी साजरी…

विधानसभेच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की प्रकरण ; सुप्रिया सुळे यांची थेट अमित शहा यांच्याकडे तक्रार , म्हणाल्या

Posted by - August 24, 2022 0
मुंबई: शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात माविआच्या आमदारांबद्दल हिंसक विधाने करून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी तक्रार राष्ट्रवादीच्या…

नदी सुधार प्रकल्पामुळे मुळा -मुठा नदीची सुमारे १६ फूट पूर पातळी भविष्यात वाढण्याची शक्यता- सारंग यादवाडकर

Posted by - March 19, 2022 0
नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे मुळा -मुठा नदीची सुमारे १६ फूट पूर पातळी भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत…
Doctor

Loksabha Election : राज्यात पहिल्यांदाच डॉक्टरांना लागणार निवडणुकीची ड्युटी

Posted by - March 27, 2024 0
शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपू नये अशी मागणी होत असतानाच आता थेट डॉक्टरांना देखील निवडणुकीच्या कामाला लावले जाणार आहे. मुंबईच्या इतिहासात…

दर्जेदार बियाणे, कृषी औजारे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवा – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Posted by - September 15, 2022 0
पुणे : शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, उत्कृष्ट पद्धतीची खते, दर्जेदार कृषी औजारे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *