Congress

Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी काँग्रेसने ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

188 0

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा (Maharashtra Politics) निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ही महायुतीवर भारी पडली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणूका पार पडणार आहेत. विधान परिषदेवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस रंगली आहे. या निवडणुकीसाठी भाजप, ठाकरे गट, शिंदे गट, मनसे यांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून रमेश श्रीधर कीर यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे.

कशी पार पडणार विधान परिषदेची निवडणूक?
विधान परिषदांच्या निवडणुकीसाठी 31 मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. 7 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी 10 जून रोजी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 12 जून आहे. 26 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत या चारही मतदारसंघांकरिता मतदान होईल. सोमवार 1 जुलै 2024 रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया 5 जुलै रोजी पूर्ण होणार आहे. संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे.

‘या’ आमदारांचा कार्यकाळ संपणार
विलास विनायक पोतनीस – मुंबई पदवीधर (ठाकरे गट)
निरंजन वसंत डावखरे – कोकण पदवीधर (भाजप)
किशोर भिकाजी दराडे – नाशिक शिक्षक (ठाकरे गट)
कपिल हरिश्चंद्र पाटील – मुंबई शिक्षक (लोकभारती)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ‘या’ विद्यमान खासदारांचा झाला पराभव

Bajrang Sonawane Accident : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेंच्या कारचा भीषण अपघात

Share This News

Related Post

Sharad Pawar And Jayant Patil

Ajit Pawar : अजित पवारांचं समर्थन भोवलं; ‘या’ मोठ्या नेत्यावर राष्ट्रवादीकडून कारवाई

Posted by - July 4, 2023 0
नागपूर : अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या काही समर्थक आमदारांसह राष्ट्रवादीमधून बंड केल्यामुळे पक्षात मोठी फूट पडली आहे. यामुळे आता…

लोकसभेचा बिगुल वाजला! महाराष्ट्रात कधी होणार मतदान? जाणून घ्या एका क्लिकवर

Posted by - March 16, 2024 0
  संपूर्ण देशाचे लक्ष ज्या लोकसभा निवडणुकांकडे लागलेला आहे त्याच निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. लोकसभा निवडणूक 2024 हितेश…

कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू, संजय राऊत यांचा इशारा

Posted by - April 4, 2022 0
नवी दिल्ली- कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई महापालिका निवडणूक जिंकू, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला दिला…

कोणत्या नेत्यावर संजय राऊत डागणार तोफ ; संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

Posted by - March 7, 2022 0
शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत उद्या मंगळवारी (दि.8 मार्च) दुपारी 4 वाजता मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असून…
Ajit Pawar

Ajit Pawar : ‘जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी

Posted by - December 26, 2023 0
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याच्या राजकारणाला एक वेगळेच वळण मिळाले. लोकसभेच्या निवडणूक तोंडावर आल्या असताना अजित पवार (Ajit Pawar)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *