दिलासादायक ! पुढील आर्थिक वर्षात करवाढ नाही

162 0

मिळकत कर आणि करमणूक करात पुढील आर्थिक वर्षात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेले मिळकत कर आणि करमणूक करांचे दर पुढील आर्थिक वर्षात ही कायम ठेवणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, उपलब्ध आर्थिक स्त्रोतांचा विचार करून अत्यावश्यक खर्च, प्रकल्पीय किंवा भांडवली खर्च यांचे आगामी वर्षासाठी नियोजन करावे लागते. त्यानुसार कराचे दर निश्चित करावे लागतात. महापालिका अधिनियमानुसार या दरांना दरवर्षी २० फेब्रुवारी पूर्वी मुख्य सभेची मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार आज करांचे दर निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रासने पुढे म्हणाले, १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत मिळकतीचा पूर्ण कर भरणार्या मिळकतकरांना देण्यात येणार्या पाच किंवा दहा टक्के सवलती, गांडूळ खत प्रकल्प, सौरउर्जा प्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग या योजना राबविण्यार्या मिळकतकरधारकांना देण्यात येणार्या सवलती पुढील आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या पत्नी किंवा माता, राष्ट्रपती पदक विजेते, माजी सैनिक, सैनिकांच्या पत्नी किंवा वीरपत्नींना राज्य शासनाच्या नियमांनुसार विविध प्रकारच्या करसवलती देण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेतील सध्याच्या मिळकती आणि नव्याने समाविष्ट गावांतील मिळकतीतून पुढील वर्षी दोन हजार ३३२ कोटी रुपयांचा अपेक्षित अंदाज करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

सामना वर्तमानपत्राच्या विरोधात भाजपा आक्रमक

Posted by - August 19, 2023 0
सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय. फडणवीस, सांभाळा!, या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. सामनाच्या अग्रलेखात लिहिण्यात आले की,…

पुणे महानगरपालिका निवडणूक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत व्हाव्यात ; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल – प्रशांत जगताप

Posted by - August 12, 2022 0
पुणे : मार्च २०२२ मध्ये होऊ शकत असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका ओबीसी बांधवांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे, याकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या लढाईसाठी…
Narendra Modi

Narendra Modi : जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका!

Posted by - April 20, 2024 0
गरीबीची कुचेष्टा आणि गरीबांची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसने जनतेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. त्यांच्या इंडीया आघाडीतील पक्षांचा परस्परांवर विश्वास नाही, त्यामुळे…
Arrest

Pune News : पुण्यात ATS ची मोठी कारवाई ! बेकायदा वास्तव करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक

Posted by - December 15, 2023 0
पुणे : पुणे एटीएस (Pune News) पथकाने जिल्ह्यातील नारायणगाव या ठिकाणी एक मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी सकाळी नारायणगावात एटीएसच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *