Eknath Shinde Call

Mumbai News : खळबळजनक ! चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरले

289 0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी सही आणि शिक्के वापरल्याचा धक्कादायक प्रकार (Mumbai News) मुख्यमंत्री सचिवालयात उघडकीस आला आहे. मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरल्याच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांची बनावट सही आणि शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सचिवालयात कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री शिंदे यांची बनावट स्वाक्षर आणि शिक्के असल्याचं आढळून आलं. मुख्यमंत्री सचिवालयाच्या निदर्शनास ही बाब येताच याप्रकरणी मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसेभत दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आढळून आले आहे. ही बाब गंभीर असून तेवढ्याच गंभीरपणे राज्य सरकारने त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे कोण आहे याचा तपास सुरु आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ahmednagar News : खळबळजनक ! हळदीच्या सोहळ्यात जेवल्याने अहमदनगरमध्ये 200 जणांना विषबाधा

Accident News : दुर्दैवी ! पिकअप गाडीचा भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

Paschimottanasana : पश्चिमोत्तासन कसे करावे आणि काय आहेत त्याचे अद्भुत फायदे?

Share This News

Related Post

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून; 6 दिवस चालणार प्रत्यक्ष कामकाज

Posted by - August 11, 2022 0
मुंबई: मंत्रिमंडळ विस्तारामुळे रखडलेले राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान होत असून प्रत्यक्ष कामकाज सहा दिवस होणार…
Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : मोदींच्या नेतृत्वावर देशवासियांचा अढळ विश्वास : मुरलीधर मोहोळ

Posted by - December 3, 2023 0
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशवासियांचा अढळ विश्वास आहे, यावर या निकालाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. मोदींवर…
Yavatmal Accident

Yavatmal Accident : लग्नाच्या स्वागत समारंभावरून परतताना बसचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Posted by - April 28, 2024 0
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातून (Yavatmal Accident) अपघाताची एक घटना समोर आली आहे. यामध्ये बस आणि आयशर गाडीचा भीषण अपघात झाला…

मोठी बातमी! माजी मंत्री विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

Posted by - July 16, 2022 0
मुंबई: शिवसेनेतील बंडानंतर आता बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी सुरू आहे. शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोर नेत्यांवर कठोर…

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेचा शरद पवार यांनी घेतला समाचार, म्हणाले..

Posted by - April 13, 2022 0
मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत केलेल्या टीकेला शरद पवारांनी आज जोरदार उत्तर दिलं आहे.’एखादी व्यक्ती वर्ष-सहा महिन्यातून वक्तव्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *