खोकेवाला आला हो खोकेवाला आला…! (संपादकीय)

179 0

एकनाथ शिंदेंनी बंड केलं कालांतरानं ते थंडही झालं पण या बंडामुळं त्यांच्या विरोधकांनी दिलेली घोषणा आजही तितकीच गरमागरम आहे. या घोषणेमुळं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापू लागलंय. ही घोषणा म्हणजे ’50 खोके एकदम ओके’ ! शिंदे गटातील आमदारांपैकी एकही आमदार या घोषणेपासून वाचू शकला नाही. दिवाळीसारखा सण-उत्सव असो की लग्न समारंभ; यातील एका जरी आमदारानं एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली की लोक म्हणतात, ‘खोकेवाला आला हो खोकेवाला आला…!’

……………………

50 खोक्यांची घोषणा; शिंदे गटाच्या आमदारांना सहन होईना !

शिंदे गटातील आमदारांनी 50 कोटी रूपये घेऊन बंड केलं, असा आरोप त्यांच्यावर सातत्यानं केला जातोय. त्यामुळं शिंदे गटातील आमदारांची बेचैनी वाढू लागलीये. अपक्ष आमदार बच्चू कडूंनी तर आपली बेचैनी प्रत्यक्षरित्या बोलून दाखवलीये. आतापर्यंत विरोधकांकडून शिंदे गटावर 50 खोक्यांचा आरोप होत होता पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आमदार रवी राणांनी देखील हा आरोप केला आणि रवी राणा व बच्चू कडू यांच्यात खोक्यावरून वाद सुरू झाला. बच्चू कडूंना कोणताही पक्ष नाही. ‘खोके आणि ओके’ हा त्यांचा पक्ष आहे, असं रवी राणांनी काय म्हटलं बच्चू कडूंनी त्यांना खोके घेतल्याचा पुरावा द्या नाहीतर माझ्या सोबत असणाऱ्या आमदारांच्या मदतीनं आम्ही 1(नोव्हेंबर) तारखेला आमची ताकद दाखवून देऊ, असं आव्हानच दिलं. शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाकडून सातत्यानं केला जाणारा हा 50 खोक्यांचा प्रचार आता संपूर्ण राज्यभरात पोहोचलाय. विधिमंडळ अधिवेशन, जाहीर सभा आणि गावागावांत ’50 खोके एकदम ओके’ हे वाक्य आता उच्चारलं जाऊ लागलंय. ‘शिंदे गटाचा आमदार का ? मग बरोबर; 50 खोके एकदम ओके,’ हे वाक्य आता सर्वांच्याच तोंडी बसलंय. बैलपोळ्या दिवशी बैलाच्या पाठीवर देखील ’50 खोके एकदम ओके,’ हे वाक्य लिहिल्याचं लोकांनी पाहिलं.
………………………..

राज्यात शिंदे सरकार स्थापन होऊन चार महिने लोटले पण अजूनही हा 50 खोक्यांचा आरोप शिंदेंसह त्यांच्या सहकाऱ्यांना खोडून काढता आलेला नाही. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि 2024 ची विधानसभा निवडणूक पाहाता शिंदे गटातील आमदारांची अस्वस्थता कायम ठेवण्यासाठी विरोधक ‘ 50 खोके एकदम ओके’ ही घोषणा थंड पडू देणार नाहीत हे नक्की !

– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी

Share This News

Related Post

एनआयआरएफ रँकिंग; पुणे विद्यापीठ देशात बाराव्या स्थानी

Posted by - July 16, 2022 0
राष्ट्रीय पातळीवर देशभरातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ २०२२ ची क्रमवारी जाहीर झाली असून सावित्रीबाई फुले पुणे…

#HEALTH WEALTH : जेवण झाले तरी वारंवार भूक लागते का ? जाणून घ्या त्यांची कारणे आणि परिणाम

Posted by - March 21, 2023 0
आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहिले असतील जे आपल्या प्रत्येक भावना अन्नाद्वारे व्यक्त करतात. दु:ख असो किंवा आनंद, त्यांचा…
uddhav-thackeray-devendra-fadanvis-ajit-pawar-eknath-shinde

Marathwada Political Sunday : मराठवाड्यात आज ‘सभांचा धडाका’ सत्ताधाऱ्यांसह विरोधक साधणार एकमेकांवर निशाणा

Posted by - August 27, 2023 0
पुणे : आगामी निवडणुका पाहता सर्वच पक्ष कामाला लागले (Marathwada Political Sunday) असून, राज्यभरात महत्त्वाच्या नेत्यांच्या सभांचा आज धडाका पाहायला…

#VIDEO : विकृताचे तरुणीसमोरच स्वतःच्या प्रायव्हेट पार्ट सोबत अश्लील चाळे; तरुणीने थेट शूट केला व्हिडिओ, आणि मग घडले असे काही !

Posted by - February 8, 2023 0
मुंबई : मायानगरी मुंबईमध्ये एक विक्षिप्त घटना समोर आली आहे. येथील एका वाहन चालकाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका तरुणीला जवळ…
Kirit somayya

भाजप नेते किरीट सोमय्या राज्यपालांची भेट घेणार

Posted by - April 26, 2022 0
मुंबई- मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणारचं असा निर्धार केलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलीसांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *