चिठ्ठी आयी है… आयी है… चिठ्ठी.. (विशेष संपादकीय)

292 0

 

मुख्य : (कानात फुसफुस… साहेब काय बोलू… नाही म्हणजे… परवा तुम्ही माझ्यासमोरचा माइकच काढून घेतलात…)

उपमुख्य : ( कानात फुसफुस… तुम्ही सुरुवात तर करा…
मी नंतर हळूच चिठ्ठी सरकवतो…)

मुख्य: तर मी काय म्हणत होतो… आजच्या कॅबिनेटमध्ये आम्ही सर्वांनी मिळून एक मोठा निर्णय घेतलाय…

(पत्रकारांमध्ये कुजबुज : सर्वांनी मिळून म्हणजे मुख्य आणि उपमुख्य असे दोघेच ना ! शू… ‘माइक’लाही कान असतात)*

मुख्य : पेट्रोल पा……च तर डिझेल ती……न रुपयांनी स्वस्त करतोय.

(ब्रेकिंग न्यूज : राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात सरकारकडून
मो………. ठ्ठी कपात; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय)

उपमुख्य: थांबा मी सांगतो…

*मुख्य* : अहो, मला बोलू द्या… मी राज्याचा मुख्य…

*उपमुख्य* : (कानात फुसफुस : हो, हो… आम्हीच तुम्हाला मुख्य…) तर त्यांना असं म्हणायचंय की…

*मुख्य* : माझं बोलणं तर कम्प्लिट होऊ द्या…

*उपमुख्य* : अजून बऱ्याच घोषणा करायच्यात, थांबा जरा…
तर या या गोष्टींचे निर्णय राज्य सरकारनं घेतले असून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हा, आता काय प्रश्न आहेत ते विचारा…

*पत्रकार १* : पेट्रोल-डिझेल स्वस्तच करायचं होतं तर…

*मुख्य* : आम्ही लवकरच…

*उपमुख्य* : (मुख्यंना मध्येच थांबवत) भविष्यात इंधन दरात आणखी कपात होईल.

*पत्रकार २* : राज्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीये तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार नाही. आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळणार ?

*मुख्य* : आम्ही दोघांनी परवाच गडचि…

*उपमुख्य* : (मुख्यंना मध्येच थांबवत) गडचिरोलीचा दौरा केलाय लवकरच राज्यातल्या इतर भागाची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करू

*पत्रकार ३* : हे सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार का ?

*उपमुख्य* : यावर मुख्य… बोलतील

*मुख्य* : हो तर… एकदम ओकेमंदी…

*पत्रकार १, २, ३*… : सर… सर… सर…

*मुख्य* : (उपमुख्यंनी दिलेली चिठ्ठी खिशात सरकवत) चला…

तेवढ्यात कुणाच्या तरी मोबाइलची रिंगटोन वाजते…

*चिठ्ठी आयी है… आयी है… चिठ्ठी…*

– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक
TOP NEWS मराठी

Share This News

Related Post

अभिनेता आर माधवनच्या मुलाने पटकावले डॅनिश ओपन जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक

Posted by - April 18, 2022 0
मुंबई – अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत यानं डेन्मार्क येथील कोपहेगनमध्ये झालेल्या डॅनिश ओपन जलतरण स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक पटकावले…

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमूलाग्र बदलांची गरज- दीपक केसरकर

Posted by - September 16, 2022 0
पुणे: महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात देशात अग्रेसर राहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे,…

‘आप’चे बीज पुरंदरमध्ये उत्तम रूजू शकते – मुकुंद किर्दत

Posted by - April 22, 2022 0
सासवड- पुरंदर तालुक्याने एकेकाळी जनता दल सारखा पर्याय सहज स्वीकारला होता, त्यामुळे ‘आप’चे बीज पुरंदरमध्ये उत्तम रूजू शकते असा विश्वास…

Decision of Cabinet meeting : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी अतिरिक्त जागांकरिता येणाऱ्या खर्चात राज्याचा हिस्सा

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : केंद्र शासनातर्फे महाराष्ट्रातील 15 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी 50 या प्रमाणे एकूण 750 जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मंजूर…
Crime

वाकड येथे पोलिसांच्या अंगावर आरोपीनं सोडलं कुत्रं ! गांजा विक्रीप्रकरणी कारवाई दरम्यान घडली घटना

Posted by - September 18, 2022 0
पिंपरी-चिंचवड शहरात गांजा विक्री करणाऱ्या तडीपार आरोपीस पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर, आरोपींनी चक्क पाळीव कुत्रा सोडून हल्ला चढवला. या घटनेत पोलीस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *