shinde and thakre

सत्तासंघर्षाचं प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे

575 0

आज सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल दिला. संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. आजचा निकाल ऐतिहासिक ठरला आहे. हा निकाल केवळ महाराष्ट्रासाठीच नाही, तर संपूर्ण देशाला लागू होणार असल्याने सगळ्यांचे या निकालाकडे लक्ष लागून राहिले होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हा निकाल जाहीर करणार आहेत.

निकालमधील काही महत्वाचे मुद्दे :
१. हा निकाल आता सुप्रीम कोर्टाने ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपावला आहे.
२. भरत गोगावले यांची प्रतोदपदी झालेली निवड बेकायदेशीर यामुळे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे.
३. व्हीप फक्त राजकीय पक्ष देऊ शकतो. गटनेत्यापेक्षा राजकीय पक्षाचा व्हीप महत्वाचा.
४. मीच खरी शिवसेना असा दावा कोणीही करू शकत नाही.
५. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती.
६ यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे तर एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.
७ बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरू शकत नाही.
८. पक्षांतर्गत वादाकडे पाहण्याचा राज्यपालांना अधिकार नाही, सुप्रीम कोर्टाने राज्यपालांना फटकारले
९. राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे, त्यांनी कोणत्याही पक्षाला सपोर्ट करणे चुकीचे असल्याचे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे.
१०. आमदारांच्या जीवाला धोका असणं म्हणजे सरकार अल्पमतात आहे असं नाही.
११. घटनापीठानं 10 प्रश्न तयार करून प्रकरण 7 बेंचकडे सोपवलं
१२. राजीनामा दिल्यामुळे ठाकरे गट अडचणीत
१३. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने सरकार परंत आणले असते.
१४. १६ आमदारांच्या अपात्रेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे
१५. सुनील प्रभू योग्य प्रदोत सुप्रीम कोर्टाचा निर्णय, उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा
१६. अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा.
१७. जुने सरकार परत आणण्याची शक्यता कोर्टाने फेटाळली.
१८. महाराष्ट्रात शिंदे- भाजप सरकार राहणार

Share This News

Related Post

54 वर्षीय प्राध्यापकाने मिठी मारून केला 27 वर्षीय प्राध्यापिकेचा विनयभंग

Posted by - April 5, 2022 0
पुणे – एका 54 वर्षीय प्राध्यापकाने एका 27 वर्षीय प्राध्यापिकेला मिठी मारून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार…

आताची महत्वाची बातमी ! एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी, गटनेतेपदी या नेत्याची निवड

Posted by - June 21, 2022 0
मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात प्रचंड राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. आताच आलेल्या बातमीनुसार एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरून…

….. म्हणून राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचा नरेंद्र मोदींवर आरोप

Posted by - March 31, 2023 0
राहुल गांधी यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. तसेच त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस देण्यात…

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या 3500 विद्यार्थ्यांकडून राष्ट्रगीताचे सामूहिक गायन ! VIDEO

Posted by - August 17, 2022 0
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) ३५०० विद्यार्थ्यांनी आज सकाळी ११ वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *