बृजभूषण सिंह यांच्या राज ठाकरे विरोधाला शरद पवारांची रसद ? आरोप करून मनसेने केला फोटो ट्विट

244 0

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असा आरोप राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केला. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द करण्याची वेळ आल्यामुळे पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह आणि शरद पवार, सुप्रिया सुळे एकत्र मंचावर दिसून येत आहेत.

भाजप नेते बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध केला होता. जोपर्यंत उत्तरभारतीयांची राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत अयोध्येत येऊ देणार नाही अशी भूमिका बृजभूषण यांनी घेतली होती. याच बृजभूषण सिंह यांचे जुने फोटो मनसेकडून शेअर करण्यात आले आहेत. या फोटोजमध्ये बृजभूषण सिंह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत स्टेजवर एका कार्यक्रमात आहेत.

या फोटो खाली सचिन मोरे म्हणतात की, “कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है…” त्यानंतर मनसेचे गजानन काळे यांनी हेच फोटो शेअर करून

“ब्रिज” चे निर्माते … सुज्ञास अधिक सांगणे न लगे …(फोटो झोऊम करून पाहावा ) असे कॅप्शन दिले आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील त्याच कार्यक्रमातील एक फोटो शेअर करून म्हटले आहे की, ‘तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांन विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे’. एकूणच या फोटोवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

बृजभूषण सिंह हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कुस्ती महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर शरद पवार हे राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. मनसे नेत्याने शेअर केलेले फोटो एका कुस्ती स्पर्धेतीलच असल्याचं दिसत आहे. सन्मान लाल मातीचा, बहुमान मावळवासियांचा, असं या फोटोतील बॅनरवर लिहिलेलं दिसत आहे.

Share This News

Related Post

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान; असा असेल प्रस्थान सोहळा

Posted by - June 11, 2023 0
टाळ – मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर – फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त…

बोधी ट्री सिस्टीम व्हायकॉम18 मध्ये 13,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

Posted by - April 28, 2022 0
जेम्स मर्डॉकच्या लुपा सिस्टम्स गुंतवणूक उपक्रम बोधी ट्री सिस्टम्स आणि उदय शंकर यांनी ब्रॉडकास्टिंग सेवा कंपनी व्हायकॉम18 मध्ये 13,500 कोटी…
Nanded News

Nanded News : शेतात काम करताना घडली मोठी दुर्घटना; बायकोच्या डोळ्यांदेखत नवऱ्याचा तडफडून मृत्यू

Posted by - September 30, 2023 0
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाचा शेतात काम करताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे.…

संतोष परब हल्ला प्रकरणाचा कट पुण्यात आखला ; नितेश राणेंना पुण्याला हलवणार

Posted by - February 3, 2022 0
सिंधुदुर्ग – शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्याचा कट पुण्यात आखण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे तपासासाठी भाजप आमदार…

अमरावती आंतरधर्मीय विवाह प्रकरण : ‘ती’ बेपत्ता तरुणी अखेर साताऱ्यात सापडली; आज अमरावतीत आणण्यात येणार…

Posted by - September 8, 2022 0
अमरावती : अमरावतीमधील आंतरधर्मीय विवाह प्रकरणातील बेपत्ता तरुणी अखेर काल साताऱ्यात सापडली. आज तिला अमरावतीत आणण्यात येईल, अशी माहिती अमरावती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *