विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी

253 0

राज्यपालांकडून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्यात आले असून त्यात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने आज राहुल नार्वेकर यांच्या नावाला पसंती दिली असून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे.

राहुल नार्वेकर हे शिवसेनेत होते, त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत होते. आता ते भाजपाचे आमदार आहेत. असे असताना त्यांचे सासरे हे विधान परिषदेचे सभापती आहेत. रामराजे नाईक निंबाळकर हे सभापती आहेत. सध्या ते विधान परिषदेवर पुन्हा निवडून आले आहेत.

शनिवारी आणि रविवारी म्हणजे 2 आणि 3 जुलैला होणारे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे अधिवेशन आता 3 आणि 4 जुलै म्हणजे येत्या रविवार आणि सोमवारी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची देखील निवड केली जाणार आहे.

भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी विधान सभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे ३ जुलैपासून दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. या अधिवेशनात एकनाथ शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. राहुल नार्वेकर हे कुलाब्याचे आमदार आहेत. २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेने लोकसभेला उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी मावळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. यानंतर ते भाजपात गेले होते.

Share This News

Related Post

‘परिणीता’चे दिग्दर्शक सुजित सरकार यांचे निधन

Posted by - March 24, 2023 0
‘परिणीता’चे दिग्दर्शक सुजित सरकार यांचे मूत्रपिंडाच्या आजाराने निधन झाले. चित्रपट निर्माते प्रदीप सरकार यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.…
Dead

धक्कादायक ! शेततळ्यात बुडून दोन मुलींसह महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 16, 2023 0
सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यातील कराड (Karad) तालुक्यातील पाडळी – हेळगाव (Padli – Helgaon) या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस…

आरती सुरु असताना 100 वर्ष जुने कडुलिंबाचं झाड कोसळले, ७ जण दगावले

Posted by - April 10, 2023 0
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातुन एक धक्कादायक घटना घडली आहे. पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच 100 वर्ष जुनं…
Ajit Pawar

अजित पवारांसोबत असणारा 42 आमदार कोण? समोर आलं हे मोठं नाव

Posted by - October 7, 2023 0
राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. दोन्ही गटांनी पक्ष आपलाच असल्याचं सांगत दावे-प्रतिदावे केले आहेत. याबाबत…
chagan Bujbal

Maharashtra Politics : ‘भुजबळांच्या वयाचा आदर करतो पण…’; ‘या’ भाजप नेत्याने दिला इशारा

Posted by - May 28, 2024 0
मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) सहा टप्प्यांसाठी मतदान पार पडलं आहे. सातव्या टप्प्यासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *