Brijendra Singh

Lok Sabha Election : खासदार ब्रिजेंद्र सिंह यांचा भाजपला रामराम; ‘या’ पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

383 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपसह काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादीसुद्धा जाहीर केली आहे. यादरम्यान भाजपला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. यामध्ये भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही घोषणा केली आहे. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर खासदार ब्रिजेंद्र सिंह हे वडील बिरेंद्र सिंह यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

हरियाणातील हिसार लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ब्रिजेंद्र सिंह हे वडिलांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ब्रिजेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावर म्हटलं की, राजकीय कारणास्तव भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान मोदी, अमित शहा यांनी मला हिसारच्या लोकांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो.

कोण आहेत ब्रिजेंद्र सिंह ?
ब्रिजेंद्र सिंह हे माजी आयएएस अधिकारी आहेत. त्यांचे वडील बिरेंद्र सिंह हे 2022 पर्यंत राज्यसभा खासदार होते. तर पाच वेळा आमदार आणि तीन वेळा राज्यात मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय.1984 मध्ये ओमप्रकाश चौटाला यांचा त्यांनी पराभव केला होता. 2019 मध्ये बिरेंद्र सिंह यांनी मुलगा ब्रिजेंद्र याला तिकिट मिळवून दिलं होतं. यावेळी तिकिट मिळण्याची शक्यता कमी असल्याने त्यांनी असा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : मनोज जरांगेंवर ‘त्या’ प्रकरणी दीड महिन्यानंतर गुन्हा दाखल

Accident : लग्नासाठी मुलगी बघायला निघालेल्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Sophia Leone Death : अ‍ॅडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनचे निधन

Pune News : पुण्यात ड्युटी मिळाली नाही म्हणून पीएमपी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Bakasana : बकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Ujjwal Nikam

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

Posted by - May 3, 2024 0
मुंबई : लोकसभेच्या पाचव्या टप्यातील निवडणुकीसाठी आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुंबईतील तीन उमेदवार आज अर्ज भरणार आहेत.…

पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

Posted by - October 20, 2022 0
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत…

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; अधिवेशनात ‘हे’ मुद्दे गाजणार

Posted by - March 4, 2022 0
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि नवाब मलिक यांचा राजीनामा हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे तर…
Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळ यांनी नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारला

Posted by - June 13, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी गुरुवारी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला.…

विजय शिवतारेंचं बंड शमलं; वर्षा बंगल्यावरच्या ‘त्या’ बैठकीत नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण INSIDE STORY

Posted by - March 30, 2024 0
पुरंदर: मागील काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदार संघ आणि त्याची निवडणूक हा चर्चेचा विषय ठरला आहे. याला कारण म्हणजे अजित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *