Ramchandra Avsare

भाजपचे माजी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांचे निधन

739 0

भंडारा : राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भंडारा (Bhandara) विधानसभा क्षेत्राचे भाजपचे माजी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे (Ramachandra Avasare) यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने (Heart Attack) निधन (Pass Away) झालं आहे. रामचंद्र अवसरे 65 वर्षांचे होते. रामचंद्र अवसरे हे भाजपच्या (BJP) प्रदेश कार्यकारिणीत निमंत्रित सदस्य होते. 2014 ते 2019 या कालावधीत ते भंडारा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार राहिले आहेत. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण भंडारा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

रामचंद्र अवसरे हे भाजपची भंडारा येथील बैठक आटोपून मुलीच्या घरी मुक्कामासाठी गेले होते. पण तिथे त्यांची अचानक प्रकृती बिघडली. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने भंडारा शहरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. रामचंद्र अवसरे यांच्या निधनामुळे भंडारा जिल्ह्यात भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

रामचंद्र अवसरे यांची कारकीर्द?
माजी आमदार रामचंद्र अवसरे हे आधी शिवसेनेचे कार्यकर्ते होते. ते 2009 पर्यंत शिवसेनेत होते. पण 2009 ला त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी लढवली होती. पण त्यावेळी त्यांना पराभवाला मुकावं लागलं होतं. या दरम्यान 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपने त्यांना निवडणुकीचं तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत ते जिंकून आले होते. ते 2014 ते 2019 या काळात आमदार होते.

Share This News

Related Post

PUNE CRIME : 100 हुन अधिक घरफोड्या करणारा अट्टल चोरटा जेरबंद; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Posted by - December 23, 2022 0
पुणे : भारती विद्यापीठ पो.स्टे. गुन्हा रजिस्टर नंबर 848/2022 भा.द.वि. कलम 454, 380 या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस…

#BEAUTY TIPS : पॅची दाढीमुळे खराब झाले सौंदर्य ? स्टाईलिश लूकसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Posted by - March 15, 2023 0
आजकाल लांब दाढी प्रचलित आहे. रन मशीन विराट कोहलीपासून ते किवी वॉल केन विल्यमसनपर्यंत अनेक बड्या स्टार्स आणि अॅथलीट्सच्या दाढी…

चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना ‘हे’ महत्वाचे आदेश

Posted by - December 13, 2022 0
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक केली होती. या प्रकरणानंतर…

राज्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती होणार !, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

Posted by - January 29, 2022 0
मुंबई- पोलीस दलात जाणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री…
Eknath Shinde And Devendra Fadanvis

शिंदे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती; हे आहेत सरकारचे मोठे निर्णय

Posted by - June 30, 2023 0
मुंबई: राज्यात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *