Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंना भाजपकडून कोणतीही ऑफर नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

452 0

सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्याला आणि मुलगी प्रणिती शिंदेंना भाजपने ऑफर दिल्याचा मोठा गौप्यस्फोट केला. यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं.‘सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत मी जबाबदारीने सांगत आहे. भाजपकडून प्रणिती शिंदे किंवा सुशील कुमार शिंदे यांना अशी भाजपकडून कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही. मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या जात आहेत. भेट होणं ही गोष्ट वेगळी आहे. सुशीलकुमार शिंदे आणि माझी ही दोन-तीन वेळा भेट झाली आहे.. पण ती गोष्ट वेगळी आहे, असं बावनकुळेंनी स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना श्री बावनकुळे म्हणाले की, नरेंद्र मोदी हेच अखंड भारत करू शकतात, असे उद्धव ठाकरे व संजय राऊत म्हणाले होते. ज्या काँग्रेस पार्टीने रामाला, रामसेतूला काल्पनिक म्हटले आहे अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे आहेत. ठाकरे यांच्या सर्व आक्षेपांना राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिले आहे.

Share This News

Related Post

#MAHARASHTRA POLITICS : “… म्हणून अजित दादा पवार यांना मुख्यमंत्री करता आले नाही ! ” शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Posted by - February 11, 2023 0
नाशिक : अजित पवार यांना मुख्यमंत्री पद का दिले नाही यावरून टीकाटिप्पणी होत असताना शरद पवार यांनी थेट उत्तर देऊन…

गुजरातमध्ये ‘आप’चा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला; पाहा कोण असेल ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

Posted by - November 4, 2022 0
गुजरात: आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये आपला मुख्यमंत्री चेहरा जाहीर केला आहे. केजरीवाल यांनी…

संजय राऊतांवर ही कारवाई अपेक्षित होती – छगन भुजबळ

Posted by - July 31, 2022 0
संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.छगन भुजबळ म्हणाले, राऊतांवर ही कारवाई अपेक्षित…

Union Minister Raosaheb Danve : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; ‘त्या’ व्हिडिओ बाबत दानवेंचे स्पष्टीकरण

Posted by - December 5, 2022 0
जालना : एकीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले अवमानकारक वक्तव्य यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. आजपर्यंत…

राज ठाकरे यांची पुण्यात ‘या’ दिवशी सभा, सभेच्या परवानगी बाबत गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले

Posted by - May 17, 2022 0
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. अयोध्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांची पुण्यात सभा होणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *