माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपाचा उमेदवार ठरला? ‘या’ चेहऱ्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता

150 0

भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी विशेष निर्णय ती आखली जात असून याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिण मतदार संघामध्ये भाजपाचा जनसंवाद मेळावा पार पडणार आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसल्यानंतर भाजपा आता विधानसभेसाठी विशेष रणनीती असताना पाहायला मिळत असून या पार्श्वभूमीवरच भाजपाकडून विविध ठिकाणी जनसंवाद मेळावा विस्तारित कार्यकारीणी बैठका आयोजित केल्या जात आहे.

याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदार संघामध्ये 16 ऑगस्ट रोजी भाजपाचा जनसंवाद मेळावा पार पडत असून या मेळाव्याच्या माध्यमातून भाजपा पश्चिम महाराष्ट्रात मोठं शक्ती प्रदर्शन करणार असून भाजपकडून प्रदेश चिटणीस असणारे डॉ. अतुल भोसले यांना पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात रिंगणात उतरवण्याची शक्यता असून या अनुषंगानं अतुल भोसले यांना ताकद देण्यासाठी या जनसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं राजकीय वर्तुळात बोलला जात आहे.

कोण आहेत अतुल भोसले

उच्चविद्याविभूषित असणारे डॉ. अतुल भोसले यांच्याकडे भाजपाच्या प्रदेश चिटणीस पदाची जबाबदारी आहे

भाजपाचे सांगली जिल्हा प्रभारी म्हणूनही डॉ. अतुल भोसले यांच्याकडे जबाबदारी आहे

डॉ. अतुल भोसले हे श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष

डॉ. अतुल भोसले हे सातारा जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य देखील आहे.

2019 ची विधानसभा निवडणूक डॉ. अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये लढवली होती त्यावेळी त्यांना 83,166 इतकी मतं मिळाली होती व ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते

Share This News

Related Post

पुण्यात शिवसेनेचा पत्ता कट ?; भाजप आणि अजित पवार गट लढवणार “या” जागा 

Posted by - October 9, 2024 0
विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर लवकरच आचारसंहिता लागणार आहे. त्या अनुषंगाने सर्व पक्षांमध्ये अंतर्गत बैठका, चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे जागा…

धक्कादायक : वाघोलीमध्ये टॅंकमध्ये पडुन 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - October 21, 2022 0
पुणे : वाघोलीमध्ये आज पहाटेच्या सुमारास एस.टी.पी टॅंकचे काम चालू असतांना ३ कामगारांचा टॅंक मध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना…

…अखेर ‘त्या’ वादग्रस्त घोषणेप्रकरणी गुन्हा दाखल

Posted by - September 25, 2022 0
पुणे: देशविघातक कृत्य केल्याच्या आरोपावरून गुरुवारी पी.एफ.आय. संघटनेच्या अनेक कार्यालयांवर ठिक ठिकाणी NIA आणि ईडीकडून छापे टाकण्यात आले. पुण्यातून सुद्धा…

शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात दूध का दूध पानी का पानी येत्या तीन ते चार दिवसात होणार – रूपाली चाकणकर

Posted by - March 21, 2022 0
शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी केलेल्या बलात्कार केलेल्या प्रकरणातील मुलगी पुण्यात आली आहे. भाजप च्यानेत्या चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक…
Pune News

Ajit Pawar : कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका ; मावळात ‘धनुष्यबाण’च चालवा : अजित पवार

Posted by - April 8, 2024 0
पुणे : कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ‘धनुष्यबाण एके धनुष्यबाण’च चालवावे, अशा स्पष्ट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *