Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनीच साजरा व्हावा : देवेंद्र फडणवीस

575 0

पुणे : ‘वाढदिवस साजरा करताना लोकोपयोगी उपक्रम राबवणे हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण आपण समाजासाठी जीवन वाहून दिलेले असते. त्यामुळे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करणे, ही चांगली संकल्पना आहे’, अशा शब्दात रक्तदान महासंकल्प दिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर उपक्रमाचे कौतुक करत भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी एकूण 8 हजार 197 रक्त पिशव्या संकलित झाल्या असून यंदा रक्तदान महासंकल्प दिवसाचे चौथे वर्ष होते.

संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी काही रक्तदात्यांशी संवाद साधत मोहोळ यांचा अभिष्टचिंतनपर सत्कार केला. फडणवीस पुढे म्हणाले, ‘जीवनदान देण्यासाठी रक्ताची अतिशय गरज असते. आपल्याकडे अनेक वेळा रक्तपुरवठा अपुरा असतो आणि रक्तदाते शोधावे लागतात म्हणूनच हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे आहे. गरजूंसाठी रक्ताचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी शिबिराचे आयोजन गरजेचे आहे’

अभिष्टचिंतनानंतर मोहोळ म्हणाले, वाढदिवस विधायक आणि सामाजिक उपक्रमाने साजरा व्हावा, याची प्रेरणा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून मिळाली. कोविड काळात अत्यंत निकडीच्या काळात सुरु झालेल्या रक्तदान शिबिराला आता लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होत आहे. ही निश्चितच समाधानाची बाब आहे. सार्वजनिक आणि राजकीय जीवनात काम करणाऱ्यांना माझे आवाहन आहे, पुणे शहरातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जावे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Eknath Shinde

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे 16 आमदार पात्र – राहुल नार्वेकर

Posted by - January 10, 2024 0
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल दिला. शिवसेना…
jitendra-awhad

“महाबीर बिक्रम बजरंगी…”, जितेंद्र आव्हाडांचा भाजपाला खोचक टोला

Posted by - May 13, 2023 0
मुंबई : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. यामध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता राखली आहे. भाजपचा या निवडणुकीत…
Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं! दरोडेखोरांनी पतीला दिला गळफास, अन् पत्नीसोबत…

Posted by - September 21, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे-बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दरोडा टाकण्यात…
Manoj Jarange

Manoj Jarange : मी माझ्या भूमिकेवर ठाम; अजूनही वेळ गेलेली नाही जरांगे पाटलांनी पुन्हा दिला सरकारला इशारा

Posted by - March 24, 2024 0
जालना : आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली…
jagdish Mulik

‘द केरळ स्टोरी’ राज्यात करमुक्त करावा; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

Posted by - May 10, 2023 0
पुणे : दिग्दर्शक सुदिप्तो सेन (Director Sudipto Sen) यांचा ‘द केरळ स्टोरी’ ( The Kerala Story) हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *