Raj Thackeray

Raj Thackeray : भाजपला पाठिंबा जाहीर करताच राज ठाकरेंना बसला ‘हा’ मोठा धक्का

368 0

मुंबई : मनसेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कालच मनसेचा (Raj Thackeray) गुढीपाडवा मेळावा पार पडला. यानंतर आज लगेच मनसेला मोठा धक्का बसला. मनसेचे सरचिटणीस कीर्ती कुमार शिंदे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपसोबत जाण्याची भूमिका न पटल्यानं कीर्ती कुमार शिंदे यांनी पक्षाला “जय महाराष्ट्र” केला आहे. मनसे सरचिटणीस आणि मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा कीर्ती कुमार शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. फेसबुक पोस्ट करून त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.

काय लिहिले फेसबुक पोस्टमध्ये?
‘‘अलविदा मनसे!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे…” अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक ‘अनाकलनीय’ वर्तुळ पूर्ण झालं.

पाच वर्षांपूर्वी 2019 लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप- मोदी- शाहंविरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी (राजकीय पातळीवर) अत्यंत महत्त्वाचा काळ होता. त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर- ‘लाव रे तो व्हिडिओ’ सभांना मी उपस्थित होतो आणि सभांमध्ये ते जे भाजप- पंतप्रधान मोदी- शाह यांच्या विरोधात जे तथ्य- विचार मांडत होते त्यांबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो.

आज 5 वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते. त्यांचं काय?’’ असा सवाल कीर्ती कुमार शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nana Patole : धक्कादायक ! नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात

शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

Share This News

Related Post

‘… तर अनिल देशमुख फरार होतील’, केतकी चितळेची अनिल देशमुख यांच्या विरोधात याचिका

Posted by - June 6, 2022 0
मुंबई- शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली…

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी स्थापन केली संघटना; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

Posted by - May 9, 2022 0
मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवी संघटना स्थापन केली असून या संघटनेचे एसटी कर्मचारी जनसंघ…

महत्वाची बातमी ! मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न फसला, पोलिसांच्या हातून निसटले

Posted by - May 4, 2022 0
मुंबई- मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना दादर भागातून ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न फसला. ताब्यात घेत असताना संदीप देशपांडे पळून गेले. …

बीड :”नव्या काळातले युद्ध समाज माध्यमांवर लढले जाते…!” – पंकजा मुंडे

Posted by - September 29, 2022 0
बीड : बीडच्या परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या संत भगवान बाबा प्रतिष्ठान यांच्या सार्वजनिक दुर्गा महोत्सवाला भाजप नेत्या पंकजा मुंडे…

‘…. म्हणून अंबादास दानवे मुख्यमंत्र्यांवर टीका करतात’, उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

Posted by - April 8, 2023 0
येत्या काळात राज्यात आणखी एक भूकंप घडू शकतो असे भाकीत करून उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *