गोव्यात मोठा राजकीय भूकंप;काँग्रेसचे 10 आमदार भाजपच्या वाटेवर

203 0

गोवा : गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 11 जुलैपासून सुरू होते आहे. तत्पूर्वीच गोव्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून 11 पैकी १० आमदार भाजपमध्ये सामील होण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते आहे.
या राजकीय हालचालींचा अंदाज येताच काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव तातडीने दाखल झाले असून आमदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. परंतु विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांच्यासह ९ काँग्रेसचे आमदार भाजपात विलीन होण्याच्या निर्णयाबाबत ठाम असल्याची माहिती मिळते आहे.
त्यासह भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून देखील मान्यता मिळाली आहे अशी माहिती भाजपच्या स्थानिक वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळपर्यंत काँग्रेसचे हे १० आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

Share This News

Related Post

तीनच्या प्रभागरचनेमुळे महापालिकेतील २९ माजी नगरसेवकांवर टांगती तलवार राहणार

Posted by - May 15, 2022 0
महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी रात्री जाहीर केली:त्यामुळे प्रभागाबाबतची उत्सुकता संपली असली तरी इच्छुकांच्या मनात आता महिला…

“राहुल गांधी को मैने बोहोत सालो पहले छोड़ दिया है…!”; असे का म्हणाले राहुल गांधी, वाचा सविस्तर

Posted by - November 29, 2022 0
मध्य प्रदेश : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने महाराष्ट्रात वादंग उभे राहिले होते. सध्या राहुल गांधी यांची हि यात्रा…

अशा लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही ! केतकी चितळेला राज ठाकरे यांनी सुनावले !

Posted by - May 14, 2022 0
मुंबई- अभिनेत्री केतकी चितळेच्या शरद पवार यांच्याशी संबंधित असलेल्या पोस्टवरून सध्या राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार यांच्यावर…

अजित पवार यांना कोरोनाची लागण, सोशल मीडियातून दिली माहिती

Posted by - June 27, 2022 0
मुंबई- एकीकडे महाविकास आघाडी सरकारवर सत्तेवरून पायउतार होण्याचे काळे ढग जमा झाले असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *