Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना सोलापुरात पहिला धक्का! ठाकरे गटाच्या ‘त्या’ निर्णयामुळे शिवसैनिक नाराज?

1430 0

सोलापूर : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापुरात शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षात सक्रिय असलेले ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षात काय सुरू आहे? असं म्हणत त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून सोलापूर जिल्ह्यातून उपनेतेपदी शरद कोळी यांची निवड करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या निवडीनंतर सोलापूर, पंढरपूर भागातील जुन्या शिवसैनिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. यामुळेच साईनाथ अभंगराव यांनी आपला राजीनामा दिल्याचे समजत आहे. साईनाथ अभंगराव हे शिवसेनेत गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शरद कोळी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. लगेचच त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आत्ता काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा पक्षाची कार्यकारिणी नव्यानं जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये शरद कोळी यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली. मात्र ठाकरे गटाच्या या निर्णयाला शिवसैनिकांकडून विरोध होत असल्याचं समोर येत आहे. शरद कोळी यांची उपनेतेपदी निवड झाल्यामुळेच नाराज होत सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी आपला राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Share This News

Related Post

ग्रामीण भागात हेलिपॅड ठीकंय, पण…; मुख्यमंत्र्यांच्याच गावाजवळ शिक्षणाच्या प्रश्नाची कोर्टाने घेतली दखल

Posted by - July 14, 2022 0
मुंबई : खिरखंड या गावाजवळच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव आहे आणि त्या गावात चांगले रस्ते, रुग्णालय, शाळा नाही. पण…

#NILAM GORHE : मास्क लावण्याची वेळ आली आहे का ? जनतेने मास्क लावण्यासंदर्भातील निवेदन गुरुवार पर्यंत सभागृहात सादर करावे

Posted by - March 21, 2023 0
मुंबई : आपल्या आजूबाजुला H3N2 चे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यामुळे मास्क लावण्यासंदर्भात ‘टास्क फोर्स’ चे काय म्हणणे आहे. या…
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : नितेश राणे म्हणजे ‘वेडा आमदार’ प्रकाश आंबेडकर यांची टीका

Posted by - February 23, 2024 0
अकोला : भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या पोलिसांवरील वादग्रस्त व्यक्तव्यानंतर विरोधकांनी नितेश राणे यांच्यासह सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले…
PMPML

Pune PMPML : बस चालकाने अरेरावी केली तर या नंबरवर कॉल करा अन् मिळवा 100 रुपयांचं बक्षीस

Posted by - July 13, 2023 0
पुणे : पुण्यात वाहतुकीसाठी पीएमपीएमएलचा (Pune PMPML) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामधून प्रवास करत असताना बसचालक अनेकदा अरेरावी किंवा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *