Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : लोकसभेच्या प्रचाराआधी अजित पवारांना मोठा धक्का ! कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

3454 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमधून उठाव केल्यानंतर पक्षामध्ये मोठी फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले. यानंतर दोन्ही गटांकडून राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नावावर दावा करण्यात आला होता. मात्र राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.

काय झाले सुनावणीमध्ये?
सुनावणीदरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तीवाद केला. अजित पवार गटाकडून शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरला जात असल्याचा आरोप सिंघवी यांनी केला. तसेच यावर आक्षेप देखील घेतला. अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयात काही पोस्टर दाखवले, अजित पवार गटाचे हे पोस्टर्स पाहा, त्यावर शरद पवारांचा फोटो आहेत, अजित पवार शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह कसं वापरतात? त्यांना आमचा फोटो, घड्याळ वापरण्याची परवानगी देऊ नका ही आमची मागणी आहे, असा युक्तीवाद सिंघवी यांच्याकडून करण्यात आला होता.

याची दखल घेत न्यायालयानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगलंच फटकारलं आहे. शरद पवार यांचं नाव आणि फोटो कुठल्याही स्तरावर वापरणार नाही, असं लेखी स्वरूपात द्या अशी सूचना न्यायालयाकडून देण्यात आल्या. तसेच तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा शरद पवार यांचा फोटो वापरू नका असेदेखील कोर्टाने म्हंटले आहे. 18 मार्चला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nilesh Lanke : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील पक्षप्रवेशाबाबत निलेश लंके यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Pune News : पुण्यातील ‘या’ कंपनीवर ईडीची कारवाई; ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता केली जप्त

Nashik News : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत मोठा गोंधळ; ‘या’ मोठ्या नेत्याला करण्यात आली धक्काबुक्की

Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रुग्णालयात दाखल

RBI : RBI कडून ‘या’ 2 मोठ्या बँकांवर दंडात्मक कारवाई

Pawanmuktasana : पवनमुक्तासन करण्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

Yavatmal News

Yavatmal News : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकाची निर्घृणपणे हत्या; यवतमाळमधील घटना

Posted by - November 17, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी जांब येथे एका शिवसैनिकाची चाकूने…

आयएनएस विक्रांत बचाव निधीप्रकरण, सोमय्या पिता-पुत्र पोलीस चौकशीला गैरहजर

Posted by - April 9, 2022 0
मुंबई- आय एन एस विक्रांत या युद्धनौका निधी प्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉमबे पोलीस…
Nawab Malik

Nawab Malik: नवाब मलिकांना मोठा धक्का ! हायकोर्टानं जामीन फेटाळला

Posted by - July 13, 2023 0
मुंबई : आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा धक्का…
Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : “माझा फोटो परवानगीशिवाय वापरु नये”, शरद पवारांचा अजित पवारांना इशारा…

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसह (Ajit…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *