Beed News

Beed News : ‘या’ कारणामुळे प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्ला रोखता आला नाही; बीडच्या पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा

396 0

बीड : काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. या हिंसक वळणाचा सर्वाधिक फटका बीड (Beed News) जिल्ह्याला बसला आहे. यामध्ये आंदोलकांनी बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या घरावर दगडफेक तसेच जाळपोळ केली. त्यांनी सरकार मालमत्तेचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर आणि माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. या सगळ्या प्रकाराबाबत आता बीडच्या पोलीस अधीक्षकांनी मोठा खुलासा केला आहे.

काय केला खुलासा?
मराठा आरक्षण आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिंसक वळण लागल्यानंतर माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर आणि वाहनांवर दगडफेक करून जाळपोळ करण्यात आली होती. यावेळी पोलीस फोर्स कमी असल्याने हल्ल्याच्या घटना रोखता आल्या नाहीत असा खुलासा बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केला आहे.

बीडमध्ये झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या प्रकरणी आतापर्यंत 278 जणांना अटक करण्यात आली असून, हल्ले करणाऱ्या सहा टोळ्या पोलिसांनी निष्पन्न केल्या आहेत. या टोळ्यांशी संबंध असलेल्या काही व्यक्तींना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. घटनेबाबत आणखी तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी म्हटलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Amravati News : अमरावतीमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर पलटी होऊन 20 मजूर जखमी

Weather Update : राज्यात थंडीला सुरुवात; मात्र ‘या’ ठिकाणी आज पडणार पाऊस

Maratha Reservation : राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

Share This News

Related Post

Pune News

Pune News : दोघांचा नाहक बळी घेणाऱ्या आरोपीला पोलीस ठाण्यात खाऊ घालण्यात आला पिझ्झा

Posted by - May 20, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने मध्यरात्री आपल्या भरधाव कारने…
Shinde - Fadanvis

‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ शिंदेच्या ‘त्या’ सर्वेची होतेय सर्वत्र चर्चा

Posted by - June 13, 2023 0
मुंबई : मुख्यमंत्री शिंदेंच्या जाहिरातीने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ज्यावेळी राज्यात फडणवीस सरकार होते. त्यावेळी देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र अशी…
Ambadas Danve

Ambadas Danve : ‘तेव्हा तर म्हटले होते शरद पवार गुरू…’; दानवेंचा पंतप्रधान मोदींना टोला

Posted by - October 27, 2023 0
पुणे : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
Buldhana Bus Accident

Buldhana Bus Accident : टायर फुटल्यामुळे बसचा अपघात नाही; RTOच्या अहवालात माहिती उघड

Posted by - July 1, 2023 0
नागपूर : आज पहाटेच्या सुमारास (Buldhana Bus Accident) सिंदखेड राजा तालुक्यात गौ शिवारात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नागपूरकडून पुण्याच्या…

सीसीटीव्हीमधून सासऱ्याची विधवा सुनेवर नजर, सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा

Posted by - January 24, 2022 0
विधवा सुनेवर नजर ठेवण्यासाठी सासऱ्याने हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडलाय. सीसीटीव्ही कॅमेरा काढण्यास नकार दिल्यामुळे पीडित महिलेने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *