Pritam Munde

Pritam Munde : ‘मला राजकारणातील पांढरी पेशी व्हायचंय’ प्रीतम मुंडेंचं वक्तव्य

411 0

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमादरम्यान मला राजकारणातील तुरटी व्हायचंय, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या भगिनी भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी मला राजकारणातील पांढरी पेशी व्हायचंय, असे विधान केले आहे. यामुळे या दोन्ही भगिनींच्या मनात काय सुरू आहे या चर्चेला उधाण आले आहे.

काय म्हणाल्या प्रीतम मुंडे?
आज समाजात मानसिक अपंगत्वच नाहीतर समाजात व्हायरल इन्फेक्शन झालेल्या प्रवृत्ती वाढत आहेत. त्या खूप वेगाने वाढत आहेत. आपण जिकडे तिकडे पाहतोय. त्यामुळे माझ्यातील डॉक्टर कधीकधी जागा होतो, त्यामुळं अशा प्रवृत्तींना नष्ट करण्यासाठी मला राजकारणातील पांढरी पेशी व्हायचंय, असं मोठं विधान प्रीतम मुंडे यांनी केले आहे. त्या बीडच्या परळीमध्ये दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

तसेच त्या पुढे म्हणाल्या हे उदाहरण देणं गरजेचं होतं. कारण अधूनमधूम माझ्यामधील डॉक्टर जागी होत असते. त्यामुळं कुणावर टीका टिप्पणी करणं हा काही हेतू नव्हता. आम्ही अठरा पगड जातीसाठी काम करणारे आहोत. आमचे कोणतेही कार्यक्रम दाखवण्यासाठी नसतात, दाखवण्यासाठी जो कार्यक्रम घेतो तो पेशंट कुठं आहे? हे पाहण्यापेक्षा आपला फोटो कसा चांगला येईल, याकडं लक्ष देतो, असे चमकू पुढारी तुम्हाला भरपूर मिळतील, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

Share This News

Related Post

आम आदमी पार्टीचा दणका : आपच्या टीकेनंतर कर्वे पुतळा येथील चंद्रकांत पाटील यांचा फ्लेक्स रातोरात भाजपने हटवला

Posted by - October 3, 2022 0
पुणे : भारतीय जनता पार्टी ही आमदार चंद्रकांत पाटील यांना भारतरत्न महर्षी कर्वे यांच्यापेक्षा मोठे समजते का ? आमदार चंद्रकांत…
Eknath, Ajit, Devendra

आता प्रत्येक शाळेत घुमणार गर्जा महाराष्ट्र माझाचे स्वर; राज्य शासनाने घेतला ‘हा’ निर्णय

Posted by - March 17, 2024 0
School Education : शाळांमध्ये प्रार्थना , प्रतिज्ञा, राष्ट्रगीत अनिवार्य होतेच मात्र आता विद्यार्थ्यांना बालपणीच महाराष्ट्राची गौरवगाथा कळावी या करीता महाराष्ट्र…
Uddhav Thackeray

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला

Posted by - March 22, 2024 0
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. श्रीरामपूरचे माजी आमदार…

वज्रमूठ नाही….! १६ चोरांनी मिळून केलेली हातमिळवणी, आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Posted by - April 4, 2023 0
देशातील १४५ पक्षांमधील सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. या टवाळांनी परवा सभा घेतली. महाराष्ट्र विकास आघाडीची म्हणे…

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उच्चस्तरीय समीती गठीत; 14 सदस्य असलेल्या समितीत मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा समावेश

Posted by - November 19, 2022 0
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांच्या 14 सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत केली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *