Laxman Madhavrao Pawar

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून भाजपला मोठा धक्का ! ‘या’ आमदाराने दिला राजीनामा

424 0

बीड : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा दिवसेंदिवस पेटताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं देखील सुरु करण्यात आली आहेत. यादरम्यान काही नेत्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. त्यातच आता हाती आलेल्या माहितीनुसार बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी भाजपच्या पहिल्या आमदाराने राजीनामा दिला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवून देण्यात आला आहे.

लक्ष्मण पवारांनी राजीनाम्यात काय म्हंटले ?
‘महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलिंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.’ असे लक्ष्मण पवार यांनी आपल्या राजीनाम्यात म्हंटले आहे.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांचा राजीनामा
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी राजीनामा दिला आहे. मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणी करावी यासाठी काही आंदोलक त्यांच्या भेटीसाठी गेले असता त्या ठिकाणी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यानंतर हेमंत पाटलांनी तात्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.मराठा आरक्षणासाठी एखाद्या आमदार वा खासदाराने दिलेला हा पहिलाच राजीनामा आहे.

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : ‘ही’ काका-पुतण्याची जोडी फुटली; ठाकरेंकडून अजितदादांना मोठा धक्का

Posted by - January 21, 2024 0
पुणे : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार…

ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून खासदार राहणार; वायनाडच्या जागेबाबत काँग्रेसनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - June 17, 2024 0
नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी  केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे  यांनी…
Devendra Fadanvis

Devendra Fadnavis : ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी करणारे पोलिस बडतर्फ होणार; फडणवीसांची मोठी घोषणा

Posted by - December 12, 2023 0
मुंबई : सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे.…
Lal Krishna Advani

Ram Mandir : लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत; समोर आले ‘हे’ कारण

Posted by - January 22, 2024 0
अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) आज सोमवार 22 जानेवारीला अभिजीत मुहूर्तावर प्रभू रामललाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. आजचा दिवस…

Attack on MLA Uday Samant : “ही तर कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया”…! सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेतून सुभाष देसाई यांची पहिली प्रतिक्रिया..

Posted by - August 3, 2022 0
पुणे : मंगळवारी रात्री पुण्यामध्ये कात्रज परिसरात शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आला होता . या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *