Bachchu Kadu

Maratha Reservation : ‘शरद पवार खरे ओबीसी नेते, पण त्यांना मराठ्यांची अडचण’, बच्चू कडूंचा आरोप

676 0

अमरावती : मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला (Maratha Reservation) सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. यादरम्यान आता प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. पवारांनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिलं. त्यांनी ठरवलं असतं तर मराठा समाजालाही त्यावेळी आरक्षण मिळालं असतं, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. अमरावतीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.

नेमके काय म्हणाले बच्चू कडू ?
मराठा समाज हा देशातीलच आहे. मराठा समाजाला गृहित धरूनच ओबीसी आरक्षण देण्यात आलं होतं. काहीजण पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ओबीसी आणि मराठा समाजाचं काही देणं-घेणं नाही. शरद पवारांनी एका पत्रामध्ये 52 जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला होता. त्यामुळे खरे ओबीसी नेते शरद पवार आहेत. पण, 52 जातींमध्ये मराठा समाजाचाही उल्लेख केला असता, तर प्रश्न मिटला असता.

शरद पवार यांनी तेव्हाच जर मराठ्यांना घेतलं असतं तर आता ही भानगड राहिली नसती. पण तेव्हा शरद पवारांनी मराठ्यांना OBC मध्ये घेतलं नाही, त्यांनी ओबीसीचे हित जोपासलं. त्यामुळे आमचा तोच राग आहे की पवार साहेबांनी मराठ्यांना घ्यायला काय अडचण होती, अशी बोचरी टीका आमदार बच्चू कडू केली आहे. यामुळे आता राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

HIV बाधितांच्या मुलांच्या वाट्याला वनवासच ! बीडमध्ये एका मुलाला इंग्रजी शाळेनं प्रवेश नाकारला… पाहा VIDEO

Posted by - August 24, 2022 0
बीड : आई-वडील एचआयव्ही बाधित आहेत , म्हणून त्यांच्या मुलाला एका इंग्रजी शाळेनं प्री-प्रायमरीत प्रवेश नाकारल्याचा संतापजनक प्रकार बीडमधील पाली…
Kolhapur News

Kolhapur News : महिलेने ‘त्या’ गोष्टीला नकार देताच आरोपीने केलेल्या कृत्याने संपूर्ण गाव हादरलं

Posted by - December 30, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये आरोपीने शरीरसुखाची मागणी नाकारल्याने एका महिलेची गळा आवळून…

काका-पुतण्याच्या सरकारपासून बाजूला जाऊन हे शिवसेना-भाजप सरकार सामान्य लोकांसाठी काम करत आहे – केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे

Posted by - September 2, 2022 0
पुणे : सर्वात फास्ट काम राज्यात शिवसेना आणि भाजप युतीची सरकार करत आहे. जनतेने या जोडी ला पाच वर्षासाठी कौल…
Shivajirao Adhalarao Patil

Lok Sabha Elections : ठरलं! शिवाजीराव आढळराव पाटील ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Posted by - March 23, 2024 0
पुणे : शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली आहे. आढळराव…
LokSabha

Loksabha : लोकसभेत सर्वाधिक वेळा निवडून आलेले खासदार कोण?

Posted by - April 4, 2024 0
2024 या लोकसभा निवडणुकीला (Loksabha) सुरुवात झाली असून देशात या निवडणुका 7 टप्प्यात घेतल्या,जाणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये होणार आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *