Babanrao Gholap

Babanrao Gholap : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

858 0

नाशिक : शिवसेनेचे उपनेते व मागची 25 वर्षे आमदार राहिलेले बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी आज मोठा निर्णय घेत आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून घोलप शिवसेनेचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. अखेर आज त्यांनी राजीनामा देत या चर्चाना पूर्णविराम दिला. आपण कोणत्या पक्षात जाणार हे त्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही. बबनराव घोलप यांचा राजीनामा हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राजीनामा देताना काय म्हणाले बबनराव घोलप ?
मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे. कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणुन मी निष्ठेने व ईमानेईतबारीत काम केले आहे. मला पक्षाने (संघटनेने) जे जे सांगितले, ते प्रामाणिकपणे केले आहे.पण अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरुनवरुन मला काढुन मला अपमानित करण्यात आले व मी ज्यांना निष्क्रीय पदाधिकारी काढून टाकले होते. नवीन पदाधिकारी नेमले होते. त्यांना ही बदलण्यात आले, हे कितपत बरे आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे एकनिष्ठ शिवसैनिक अमर कतारीला कुठच ठेवल नाही. विशेष म्हणजे ज्या सहा विधानसभा संर्पक प्रमुखांनी लेखी कळवले होते, की हे जुने पदाधिकारी कसे बिनकामाचे बिकाऊ आहेत. ते लक्षात येऊन सुध्दा त्यांना परत घेऊन पद दिली हे सर्व पाहून मी अचंबित आहे.नेमक माझ काय चुकल ते समजल नाही. मी याबाबत दादही मागितली पण काहीच उत्तर मिळाले नाही. माझे वकीली करणारेही गप्प आहे. त्यापेक्षा आपण थांबून घेणे महत्वाचे वाटते. म्हणून मी माझा शिवसैनिक पदाचा राजीनामा देत आहे, असे बबनराव घोलप म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Electoral Bond : सरकारकडे पैसा कुठून येतो याची माहिती आता सर्वसामान्यांना मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Punit Balan : खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी

Dhananjay Munde : जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट

Pune Crime : 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Share This News

Related Post

Navi Mumbai Crime

Navi Mumbai Crime : आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्याला अटक; नवी मुंबईमधील घटना

Posted by - June 24, 2023 0
नवी मुंबई : पनवेल शहरामध्ये अल्पवयीन मुलीला धमकी देऊन (Navi Mumbai Crime) तिच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केल्याचा प्रकार घडला…

Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजलं ! ‘या’ दिवशी होणार निवडणूक

Posted by - May 8, 2024 0
मुंबई : राज्यात लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानपरिषदेच्या 4 जागांवर निवडणूका (Maharashtra Politics) होणार आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर…

नवनीत राणा यांची खासदारकी रद्द करा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित घुलेंची मागणी

Posted by - May 10, 2022 0
पुणे- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची खासदारकी रद्द करा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांनी केली…

राष्ट्रवादीचे राज्यपालांना काळे झेंडे दाखवत आंदोलन; राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे- पाटील आक्रमक

Posted by - December 2, 2022 0
पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्त्याबाबत वाद क्षमतांना दिसत नाहीये. सातत्याने राज्यपाल कोश्यारी यांना…

CHANDRASHEKHAR BAVANKULE : म्हणून राज ठाकरे आले होते …! या भेटीत राजकीय चर्चा…

Posted by - September 19, 2022 0
नागपूर : भाजप-शिंदे गटाने सत्ता स्थापन केल्यानंतर आता शिंदे गट मनसे सोबत युती करणार अशा देखील चर्चांना उधाण आले होते.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *