Narendra Modi

BJP : भाजपाच्या ‘या’ 10 खासदारांनी तडकाफडकी दिला राजीनामा; 3 केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश

720 0

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूका (BJP) नुकत्याच पार पडल्या. निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं. मात्र अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी भाजपच्या काही खासदारांनी आपला राजीनामा दिला. त्यांनी नेमका राजीनामा का दिला? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. एकूण 10 खासदारांनी राजीनामा दिला आहे.

छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंर भारतीय जनता पार्टीने बुधवारी मोठं पाऊल उचललं. या निवडणुकींमध्ये जे खासदार आमदारकीची निवडणूक जिंकले आहेत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. भाजपाने 4 राज्यांमध्ये सध्या खासदार असलेल्या 21 खासादारांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं होतं. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी 7-7 खासदारांनी निवडणूक लढवली. छत्तीसगडमध्ये 4 आणि तेलंगणमध्ये एकूण 3 खासदारांना तिकीट देण्यात आलं होतं. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन भाजपाच्या या खासदारांनी आपले राजीनामे सादर केले.

कोणकोणत्या खासदारांनी दिला राजीनामा?
राज्यवर्धन सिंह राठोड – राजस्थान
दीया कुमारी – राजस्थान
किरोडी लाल मीना (राज्यसभा सदस्य) – राजस्थान
नरेंद्र तोमर – मध्यप्रदेश
प्रह्लाद पटेल -मध्यप्रदेश
राकेश सिंह – मध्यप्रदेश
रीति पाठक – मध्यप्रदेश
उदय प्रताप सिंह – मध्यप्रदेश
गोमती साह – छत्तीसगड
अरुण साहू – छत्तीसगड

राजीनामा दिलेल्या खासदारांपैकी प्रल्हाद पटेल आणि नरेंद्र तोमर हे केंद्रीय मंत्री आहेत. छत्तीसगढमधून खासदार असलेल्या केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांनीही राजीनामा दिला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Hanjala Adnan : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनानची अज्ञाताकडून हत्या

Nanded Accident News : धक्कादायक ! जरांगेंच्या सभेच्या स्वयंसेवकांची यादी घेऊन निघालेल्या युवकाचा अपघाती मृत्यू

Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेमविवाह करणे तरुणीला पडले महागात; लग्नाच्या 6 महिन्यानंतर तरुणीची आत्महत्या

Share This News

Related Post

Eknath Khadse and raksha khadse

Eknath Khadse : सुनबाईपुढे माघार? रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत खडसेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - March 15, 2024 0
रावेर : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास 100 उमेदवारांची (Eknath Khadse) यादी जाहीर केली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातून अनेपक्षित नावांची…

दुर्दैवी घटना : सरकारी रुग्णालयात परिचारक झोपी गेला; आईला लागली झोप; एक महिन्याच्या बाळाला कुत्र्याने पळवले, सीसीटीव्ही फुटेजमुळे घटना उघडकीस

Posted by - February 28, 2023 0
राजस्थान : राजस्थानच्या शिरोही जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. राजस्थान मधील सिरोही जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील कुत्र्यांनी अवघ्या एक…

पहिल्या भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

Posted by - April 24, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दौऱ्यावर येत असेल भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी मुंबईत आले आहेत या सोहळ्यासाठी…
Charminar Express

Charminar Express : चारमीनार एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरुन घसरले; 5 जण जखमी

Posted by - January 10, 2024 0
हैदराबाद : वृत्तसंस्था – रेल्वे अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. एक्स्प्रेस गाडीचे (Charminar Express) तीन कोच रुळावरुन उतरले.…

विजय शिवतारेंचं बंड शमलं; वर्षा बंगल्यावरच्या ‘त्या’ बैठकीत नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण INSIDE STORY

Posted by - March 30, 2024 0
पुरंदर: मागील काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदार संघ आणि त्याची निवडणूक हा चर्चेचा विषय ठरला आहे. याला कारण म्हणजे अजित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *