eknath Shinde

विधानसभेत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली! ‘या’ चार अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा

5 0

नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या 288 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणुका पार पडल्या या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला महायुतीला 230 तर महाविकास आघाडीला 46 जागा मिळाल्या आहेत. पक्षनिहाय्य जागावाटपामध्ये भाजपा 133 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

त्याखालोखाल शिंदेंच्या शिवसेनेचे 57 अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 41 काँग्रेसचे 16 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 20 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दहा आमदार निवडून आले आहेत.

विधानसभा निवडणूकीचा निकाल लागू अवघा एक दिवस झाला असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. चार अपक्ष आमदारांनी शिंदेंच्या शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची विधिमंडळातील ताकद वाढले असून विधिमंडळातील संख्याबळ 57 वरून 61 वर गेलं आहे.


‘या’ अपक्ष आमदारांचा शिंदेंना पाठिंबा?

जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या शरद भिकाजी सोनवणे यांनी आपला पाठिंबा शिंदेंच्या शिवसेनेला जाहीर केला आहे. यासोबतच गंगाखेडच्या रत्नाकर गुट्टे शिरोळमधून निवडून आलेले राजेंद्र पाटील यड्रावकर आणि हातकणंगलेचे अशोक माने यांनी आपला पाठिंबा दिला आहे.


 

Share This News

Related Post

महाराष्ट्रात काँग्रेसला ‘अच्छे दिन’; तब्बल ‘इतके’ हजार उमेदवार काँग्रेसकडून इच्छुक

Posted by - September 16, 2024 0
लोकसभा निवडणुकीतनंतर महाराष्ट्रात काँग्रेसला अच्छे दिन आल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठीही इच्छुकांची निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसलाच पसंती पाहायला मिळतीय.. आत्तापर्यंत तब्बल 1633…

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात जे जे दोषी असतील त्या सर्वांनी चौकशी करणार – गृहमंत्री वळसे पाटील

Posted by - February 27, 2022 0
पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला  यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे. शासनाने फोन टॅपिंग…

पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी परिसरात आपटी बॉम्बचा स्फोट होऊन पाच वर्षांच्या चिमूकलीचा जागीच मृत्यू

Posted by - February 5, 2022 0
पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरातील वडमुखवाडी येथे आपटी बॉम्बचा स्फोट होऊन पाच वर्षांच्या चिमूकलीचा जागीच मृत्यू झालायं. तर एक मुलगा…
Modi And Amit Shah

Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का; ‘या’ केंद्रीय मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Posted by - March 19, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सगळीकडे लोकसभेचे (Loksabha Election 2024) वारे वाहू लागले आहे. भारतात सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या…

कोथरूडमध्ये यंदाही गुलाल आपलाच! भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार

Posted by - November 11, 2024 0
कोथरुड मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ११ मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *