माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

5 0

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 288 विधानसभा मतदार संघासाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

सर्वच पक्षात तयारी करत असताना आज भाजपाला विदर्भात धक्का बसला असून माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय.

राजकुमार बडोले हे 2009 ते 2019 पर्यंत भारतीय जनता पक्षाकडून अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. 2019 ला राष्ट्रवादीच्या मनोहर चंद्रिकापुरे यांनी राजकुमार बडोले यांचा पराभव केला सध्या मनोहर चंद्रिकापुरे हे अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे महायुतीत ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जाईल आणि यामुळेच राजकुमार बडोले यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याच्या चर्चा सुरू झाल्यात.

Share This News

Related Post

ई-मान्यता प्रणाली राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल-शिक्षणमंत्री दिपक केसरकर

Posted by - April 2, 2023 0
पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेली ई-मान्यता प्रणाली राज्यस्तरावरील एकात्मिक शाळा व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. अशी प्रणाली विकसीत करताना…

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - February 2, 2022 0
मुंबई- मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या…

आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील प्रति पंढरपुरात जमला वैष्णवांचा मेळा !

Posted by - July 10, 2022 0
  पुणे: आषाढी एकादशीनिमित्त पुण्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या पेशवेकालीन विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण मंदिराला…

जेष्ठ उद्योजक रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

Posted by - August 19, 2023 0
प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा आज महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार  देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये…

मोठी बातमी! अखेर 9 तासाच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात

Posted by - July 31, 2022 0
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊतांची आज सकाळपासून चौकशी सुरु होती. राऊतांविरोधात चौकशी करण्यासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *