अखेर राजेंद्र शिंगणे यांनी तुतारी फुंकलीच; शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

37 0

राज्यात विधानसभा निवडणूक घोषणा झाले असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय कृषी व संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे चांगलेच ॲक्शन मोडवर आल्याचा पाहायला मिळत असून मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात अनेक बड्या नेत्यांचा प्रवेश होताना पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या कागल चे युवा नेते समरजीत सिंह राजे घाडगे, माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.

त्यानंतर आज माजी मंत्री आणि सिंदखेड राजाचे आमदार डॉ. राजेंद्र भास्कर शिंगणे यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

राजेंद्र शिंगणे हे 1999, 2004, 2009, 2014, 2019 या मागील पाच निवडणुकांमध्ये सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून निवडून येत असून 2019 ते 2022 या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे.

Share This News

Related Post

लाडकी बहिणी योजना; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर सायबर गुन्हेगारांचा डोळा

Posted by - August 19, 2024 0
लाडकी बहिणी योजना; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर सायबर गुन्हेगारांचा डोळा; पाहा नेमकी कशी घ्याल काळजी? राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना मुख्यमंत्री…
Police Transfer

पुण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Posted by - June 17, 2023 0
पुणे : महाराष्ट्र राज्य गृह विभागाने राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत. यामध्ये काही निरीक्षकांच्या बदल्या विनंतीवरून तर…

शिवसेनेचे बये दार उघड अभियान; शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविली जाणार मोहीम

Posted by - September 25, 2022 0
देशात आणि राज्यात आदिशक्तीचा जागर असलेला नवरात्रीचा उत्सव सुरू होत असून विजयादशमीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची ऐतिहासिक सभा ही…

तुम्हीही लाखो रुपये फी भरून मुलांना कोचिंगला पाठवताय ? थांबा! कोचिंगसाठी भरलेले लाखो रुपये घेऊन संचालक झाला फरार;

Posted by - July 13, 2024 0
दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी जेईई आणि नीट सारख्या परीक्षा पास करण्यासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *