Ashish Shelar

Ashish Shelar : आशिष शेलार लोकसभा लढवणार ? ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता

391 0

मुंबई : यंदा लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेते मैदानात आहेत. भाजपकडून पक्षातील अनेक निष्ठावंतांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या सगळ्यात आशिष शेलार (Ashish Shelar) यांचे नाव अद्याप चर्चेत नव्हते. पण आता आशिष शेलार हे लोकसभेच्या रिंगणात दिसणार आहेत. अर्थात याबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु भाजपच्या पक्षांतर्गत चालू असलेल्या चर्चांमधून ही गोष्ट समोर येत आहे. पाहा आशिष शेलार नेमके कुठून लोकसभा लढवणार याबाबतची TOP NEWS मराठीची INSIDE STORY

आशिष शेलार हे उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे. या जागेसाठी पूनम महाजन यांचे नाव चर्चेत असले तरीही त्यांना उमेदवारी नाकारून शेलार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. कारण जागा वाटपानंतर ही जागा भाजपच्या पारड्यात पडलेली आहे. मात्र अजून उमेदवार घोषित झालेला नाही. या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन आहेत. त्यामुळे त्यांनाच पुन्हा तिकीट मिळेल असे वाटत होते. मात्र पुनम महाजन यांना पक्षातूनच विरोध होत आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी न देता नव्या चेहऱ्याच्या शोधात भाजप आहे. या जागेवर एखाद्या अभिनेत्रीला संधी देण्याच्या विचारात भाजप होतं. अगदी माधुरी दीक्षित पासून रविना टंडन पर्यंत अनेक नावांची चर्चा झाली. मराठी सिने अभिनेत्रींचाही विचार केला गेला. मात्र त्या ताकदीचा उमेदवार मिळत नसल्याने अखेर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभेसाठी आशिष शेलार हे आधीपासूनच इच्छुक होते, असे बोलले जात आहे. त्यातच या जागेवर उमेदवार मिळत नसल्याने शेलारांनीच निवडणूक लढवावी अशी पक्षश्रेष्ठींचीही इच्छा आहे.

उत्तर मध्य मुंबईत मराठी मतदारांपेक्षा मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे मतदार मोठ्या संख्येने आहेत. मात्र दोन्ही समाजातील मतदार हे आशिष शेलार यांच्यावर विश्वास टाकू शकतात. कारण या आधी शेलारांनी त्या प्रकारचे काम या ठिकाणी केलेले आहे. त्यामुळे ते निवडून येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच या जागेवर खरोखर आशिष शेलार लोकसभा निवडणूक लढवताना दिसणार का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : चोखंदळ पुणेकर खवय्यांच्या ‘मेहमाननवाजी’ला ‘शालिमार’चा थाट

Sharad Pawar : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर

Murlidhar Mohol : खाद्य संस्कृती जोपासणारे बंट्स बांधव ‘पक्के पुणेकर’ : मुरलीधर मोहोळ

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट; पालिका आयुक्यांनी दिले ‘हे’ आदेश

Vanchit Bahujan Aghadi : वंचित कडून कॉँग्रेसच्या बंडखोराला पाठिंबा; ‘या’ मतदारसंघात वंचितचा मोठा निर्णय

Loksabha : लोकसभेत सर्वाधिक वेळा निवडून आलेले खासदार कोण?

Pune News : क्रेनचा हूक तुटल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Vaishali Darekar : चर्चेतील चेहरा : वैशाली दरेकर

Navneet Kaur Rana : अखेर नवनीत राणांना दिलासा; जात प्रमाणबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Bharati Pawar : चर्चेतील चेहरा : भारती पवार

Congress : लोकसभेच्या तोंडावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Loksabha : अजितदादांची मोठी खेळी; अखेर ‘तो’ बडा नेता लागला हाती

Sanjay Nirupam : निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Purvottanasana : पूर्वोतानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

होळी, धुळवड साजरी करण्याबाबतची नियमावली मागे, ठाकरे सरकारचा निर्णय

Posted by - March 17, 2022 0
मुंबई- होळी आणि धुळवड साजरी करण्यावर राज्य सरकारकडून काही निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र या निर्बंधाला विरोधकांकडून होत असलेला…

एकनाथ शिंदे यांच्या धावत्या पुणे भेटीत युवा सेनेला धक्का, पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश

Posted by - July 9, 2022 0
पुणे : शिवसेनेचे आमदारांनी बंड केल्यानंतर या बंडाला पुण्यातून फारसा पाठिंबा मिळालेला नव्हता. ठाकरे यांच्याकडून पुण्याला सावत्र वागणूक दिल्याने आम्ही…
Gas Cylinder

Cylinder Price Hike : दिवाळीपूर्वी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर

Posted by - November 1, 2023 0
नवी दिल्ली : आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाई (Cylinder Price Hike) संदर्भात मोठी बातमी समोर…
Murlidhar mohol

पुण्याला मिळणार मंत्रिपदाची संधी; मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयाकडून फोन

Posted by - June 9, 2024 0
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 240 तर एनडीए आघाडीला 294 जागांवर यश मिळाल्यानंतर आज एनडीए सरकारचा शपथविधी समारंभ संपन्न होत…

मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या हार्दिक पटेल यांचा भाजप प्रवेश

Posted by - June 2, 2022 0
अहमदाबाद- गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेल याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. गांधीनगर येथील भाजप मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *