महाविकास आघाडी भक्कम आहे तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नाही. – जयंत पाटील

339 0

काल घोषित झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालाबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. शेवटी विजय हा विजयच असतो, त्यामुळे ज्यांचा पराजय झाला त्यांनी काहीही कारणं सांगितली तरी त्याचा फारसा उपयोग नाही. मात्र उत्तर प्रदेशमध्ये जर सर्व विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली असती, तर आजचे हे चित्र कदाचित दिसले नसते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपच्या हातातूनही काही राज्यं गेली आहेत. त्यामुळे एखादं मोठं राज्य जिंकलं म्हणून महाराष्ट्रातलं सरकार देखील पडेल, हे काही शक्य नाही. महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे. सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस ही आघाडी जोपर्यंत भक्कम आहे तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नाही. तसेच मुंबई महापालिका शिवसेनेच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्यारीतीने काम करत आहे. त्यामुळे भाजपकडून फक्त वातावरण निर्मिती करण्याचा प्रकार होत आहे, असे त्यांनी सांगितले.

सध्या केंद्रीय तपास यंत्रणाकडून सुरू असलेल्या धाड सत्रावर ते म्हणाले की, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करायला कोणाचाही विरोध नाही परंतु असे भ्रष्टाचारी फक्त भाजप सोडून इतर पक्षातच आहेत का ? त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांनी जरा त्यांच्याकडेही लक्ष द्यावं, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

Share This News

Related Post

चंद्रग्रहण 2022 : विज्ञान काय सांगते? इतिहास, ज्योतिष वाचा सविस्तर माहिती

Posted by - November 8, 2022 0
जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णतः वैज्ञानिक…
MVA Loksabha Formula

MVA Loksabha Formula : महाविकास आघाडीकडून अखेर जागांचा फॉर्म्युला ठरला

Posted by - February 29, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (MVA Loksabha Formula) सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली.…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Posted by - March 30, 2022 0
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय धुळवडच सुरु आहे. यात केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि राजकीय कुस्ती सुरु…
Chandrapur News

Chandrapur News : कृषी सेवक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला मात्र अचानक गंभीर आजारानं ग्रासलं, अन् संपूर्ण चंद्रपूर हळहळलं

Posted by - August 25, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये (Chandrapur News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये (Chandrapur News) एका तरुणाने व्हॉट्सॲप स्टेटसवर जळत्या…

सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह, बैठकीत सहभागी अनेक नेत्यांनाही लागण

Posted by - June 2, 2022 0
नवी दिल्ली- सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. रणदीप सुरजेवाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *