Decision of Cabinet meeting : राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मान्यता

162 0

मुंबई : राज्यात राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये मार्च 2022 पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत असे खटले मागे घेण्याची कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

त्याचप्रमाणे कोरोना काळात विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांवर खटले दाखल झाल्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी किंवा पासपोर्ट व चारित्र्य पडताळणीच्या वेळेस अडचणी येतात, ते दूर करण्यासाठी समितीकडून कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली.

पोलीस आयुक्त व अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेईल. आंदोलनामुळे उद्भवलेल्या गुन्ह्यांत जिवीत हानी झालेली नसावी, अशा घटनेत खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे. या अटी कायम ठेवण्यास मान्यता देण्यात आली.

त्याचप्रमाणे गणेशोत्सव, दहीहंडी यामधील किरकोळ स्वरुपाचे गुन्हे देखिल मागे घेण्यासंदर्भात समितीने तातडीने निर्णय घ्यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Share This News

Related Post

#Blinkit App : ऑनलाइन मागवलेल्या ब्रेड पॅकेटमध्ये निघाला जिवंत उंदीर; फोटो व्हायरल

Posted by - February 11, 2023 0
आज-काल वेगवान जीवनशैलीमुळे अनेक जण घरपोच ऑनलाईन सुविधा घेण्याकडे जास्त आकर्षित होतात. त्यामुळेच अनेक ॲप देखील विकसित झाले आहेत. असेच…

खळबळजनक : पुणे शहरात विक्षिप्त अघोरी कृत्य; मूलबाळ व्हावे म्हणून डोक्यावर बंदूक ठेवून खायला लावले घुबडाचे पाय आणि स्मशानभूमीतून आणलेल्या मृतांची राख

Posted by - January 19, 2023 0
पुणे : पुण्यातून अत्यंत खळबळ जनक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी या स्वतः बी इ कॉम्प्युटर झालेले आहेत. 2019 मध्ये…

PUNE CRIME : पुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम ; झोपलेल्या ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने खुनी हल्ला

Posted by - January 17, 2023 0
पुणे : कोयता गॅंगने पुन्हा एकदा पुण्यामध्ये धुडगूस घातला आहे. शिवाजीनगर जवळील एका मैदानावर झोपलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर तरुणांनी कोयत्याने…

पंढरपूर:’सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम राज्यातील सर्व कार्यालयात कार्यक्षमपणे राबवावा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - July 10, 2022 0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’ पुरस्काराचे वितरण पंढरपूर:सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेला ‘सुंदर माझे कार्यालय’ हा…
Pimpari Crime

Pimpari Crime : पिंपरीत रंगला फिल्मी थरार ! पैशांवरुन झालेल्या वादातून सराईत गुंडाचा भररस्त्यात खून

Posted by - August 24, 2023 0
पिंपरी : पिंपरी चिंचवड (Pimpari Crime) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीतील (Pimpari Crime) सांगवीमध्ये एका सराईत गुंडाची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *