Uddhav Thackeray

Maharashtra Politics : ठाकरे गटाचा ‘हा’ मोठा नेता पक्षावर नाराज? कार्यकर्त्यांना केले ‘हे’ भावनिक आवाहन

300 0

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली. अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यानं महाविकास (Maharashtra Politics) आघाडीचं सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. यादरम्यान उद्धव ठाकरे यांना अजून एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एक मोठा नेता पक्षावर नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कोण आहे हा नेता?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. उद्या ते चिपळूणमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपली भूमिका मांडणार आहेत. त्यांनी या मेळाव्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना एक संदेश लिहिला आहे. ‘आपल्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळण्यात आलं आहे, मनात काही खंत आहे, त्याही उघड करायच्या आहेत’ असं भास्कर जाधव यांनी या संदेशामध्ये म्हंटले आहे.

भास्कर जाधव यांनी नेमका काय लिहिला संदेश?
‘या, मला तुमच्याशी
काही बोलायचं आहे..

आपणा सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र !!

आज माझ्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीचे सिंहावलोकन करताना मला १९८५ पासून साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदारसंघातील तसेच २००७ पासून मला साथ देणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त करावेसे वाटतात. अनेक नेते हे सर्वांना संबोधितांना कार्यकर्ते असं बोलताना मी पाहिले आहे, परंतु मी कायम आपणा सर्वांना सहकारी म्हणूनच संबोधले. होय, तुम्ही सर्व माझे सहकारीच आहात.
तुम्ही सर्वांनी मला साथ दिलीत आणि त्याच ऊर्जेतून मी विकासाच्या रूपाने तुमच्या वैयक्तिक अडचणींमध्ये अथवा सार्वजनिक स्वरूपात खंबीरपणे तुमच्या पाठी उभा राहिलोय. अनेक दिग्गज मातब्बरांविरोधात प्रसंगी संघर्षही केलाय. स्वतःचे कुटुंब माता शारदादेवीच्या हवाली सोडून राना-वनात भटकून तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी व शिवसेना वाढविण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. या सर्व कालखंडात माझ्या वक्तृत्व आणि कर्तृत्वामुळे मी यशाची अनेक शिखर पार करू शकलो. मित्रांनो, गेली ४२ वर्ष सातत्याने राजकारणात एकेक पायरी वर चढण्याचा मान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या भास्कर जाधवलाच मिळालाय..
आज वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना यत्किंचितही न घाबरता उद्धवसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे. हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक तर कधी माझ्या घरावर तर कधी माझ्या कार्यालयावर वरचेवर हल्ले होतच आहेत. आता तर मला जीवनातून संपवून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून जाहीरपणे केली जात आहे अशातच ४० वर्षांपासूनचे माझे जुने-जाणते वयोवृध्द तसेच नवीन व ताज्या दमाचे सहकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हे पाहिल्यावर माझा उर भरून येतो व आजही आपण अन्यायाच्या, गुंडगिरीच्या आणि विश्वासघाताच्या विरोधात लढलं पाहिजे, ही उर्जा मिळते.

मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे. पण, या सगळ्या वाटचालीत व संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय ? या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मनात काही खंत आहेत, त्याही उघड करायच्या आहेत. यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचा आहे. सहकारी मित्रांनो, महिला भगिनींनो, तर मग रविवार दिनांक १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल, चिपळूण येथे एकत्र येऊया. आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे दोन घास एकत्र खाऊया..

मी आपली वाट पाहतोय..!!
आपला नम्र
भास्कर जाधव’

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Naukasana : नौकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

#PUNE : “…तर रविंद्र धंगेकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार” पुण्यातील शिवसेना आक्रमक

Posted by - February 28, 2023 0
#PUNE : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेले कसबा पेठ पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मतदारांच्या घरोघरी जाऊन पैसे वाटले असा…

बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचे पुण्यात निधन

Posted by - May 13, 2022 0
पुणे- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी श्रीमती संजीवनी करंदीकर (वय ८४) यांचे आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. संजीवनी करंदीकर…
Gondia News

Gondia News : आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - February 8, 2024 0
गोंदिया : गोंदियामधून (Gondia News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आपल्या आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या एका युवकाला दुर्दैवाने आपला…
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का ! सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनीदेखील सोडली साथ

Posted by - March 18, 2024 0
पुणे : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार…

रियल इस्टेट एजंट म्हणून काम करण्याचा विचार करताय ? यापुढे महारेराची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल, ही बातमी वाचाच

Posted by - January 14, 2023 0
महाराष्ट्र : रियल इस्टेट एजंटसच्या कार्यपद्धतींमध्ये विशिष्ट स्तरावर सुसंगता आणण्यासाठी नियमक आणि कायदेशीर फ्रेमवर्क आणि पद्धतींचे ज्ञान आणि जागरूकता वाढवण्यासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *