Eknath Shinde And Devendra Fadanvis

शिंदे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती; हे आहेत सरकारचे मोठे निर्णय

260 0

मुंबई: राज्यात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या वर्षभराच्या काळात शिंदे फडणवीस सरकारनं कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले याचा घेतलेला आढावा

सततचा पाऊस’ ही नैसर्गिक आपत्ती घोषित. शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदतीचा निर्णय.

आत्तापर्यंत सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी ७५५ कोटी ६९ लाख रुपये निधी वितरित

सोयाबीनवर शंखी गोगलगाईमुळे ५ जिल्हयात ०.७३ लाख हे.क्षेत्र बाधित. ९८.५८ कोटी इतका निधी.

नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांसाठी ३५० रुपये प्रती क्विंटल अर्थसाहाय्य

शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये थेट मतदान करता येणार.

राज्यात काजू फळपिक विकास योजना लागू होणार. काजू बोर्डासाठी २०० कोटी रुपये

पाच हजार गावांत जलयुक्त शिवार अभियान परत सुरु.

शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी ३ वर्षांत ३० टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण. ९.५० लाख शेतकऱ्यांना लाभ

प्रलंबित ८६ हजार ७३ कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास यावर्षी १५०० कोटी, जून २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार

नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या १ हजार ४९८ कोटी ६१ लाख खर्चास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता. नाशिक, अहमदनगर,औरंगाबाद जिल्ह्यातील ७४ हजार २१० हेक्टर सिंचन क्षेत्रास याचा लाभ.

आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणासाठी २० उमेदवारांना रु. १० हजार प्रतिमाह विद्यावेतन देणार

श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार

खासगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये सामाजिक व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीची योजना अभिमत विद्यापीठांकरीता लागू. २१ अभिमत विद्यापीठातील १४ हजार २३२ विद्यार्थ्यांना लाभ

Share This News

Related Post

” घरात जेवढी बायको फुगत नसते , तेवढे मंत्री फुगतात …! ” नाराज मंत्र्यांवर सुप्रिया सुळेंची मिश्किल टिप्पणी …

Posted by - August 16, 2022 0
पुणे : सर्वात आधी घडलं ते एकनाथ शिंदे यांचं बंड नाट्य … त्यानंतर सत्ता स्थापनेचा पेच सुटतो न सुटतो तोच…

Breaking ज्या पायरीवर पाडले त्याच पायरीवर किरीट सोमय्या यांचा झाला जंगी सत्कार

Posted by - February 11, 2022 0
पुणे- पुणे महापालिकेत शिवसेना कार्यकर्त्यांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर किरीट सोमय्या ज्या पायरीवर पडले त्याच पायरीवर आज भाजप कार्यकर्त्यांनी सोमय्या यांचा सत्कार…
Pune News

पिंपरी चिंचवड मध्ये खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई! पिस्टलसह जिवंत काडतुसं जप्त 

Posted by - October 3, 2023 0
पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार सराईत गुन्हेगाराकडून पाच देसी पिस्टल आणि दहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जगताप डेरी परिसरामध्ये असलंम…

Maharashtra Politics : ‘शिवसेना सोडून गेलेले गद्दारच, बंड करण्यासाठी…’! शिंदेंच्या गडात आदित्य ठाकरेंची गर्जना

Posted by - July 22, 2022 0
ठाणे : शिवसेना सोडून गेलेल्यांच्या रक्तात शिवसेना नव्हतीच, गेलेले ते गद्दारच आहेत. बंड करण्यासाठी हिंम्मत लागते. शिवसेनेविरुद्ध बंड केले असते,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *