अनिल देशमुखांचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला, 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी

223 0

मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुख यांना 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या अनिल देशमुख कोठडीत आहेत.

गेल्या आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने दरमहा 100 कोटींच्या वसूली प्रकरणी सचिन वाझे, संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि अनिल देशमुख या चौघांचा ताबा घेण्याची परवानगी तपास यंत्रणेला दिली होती. त्यानुसार सीबीआयने सचिन वाझेसह पालांडे आणि शिंदे या देशमुखांच्या दोन सहाय्यकांना सोमवारी (4 एप्रिल) सीबीआयकडून अटक करण्यात आली.

अटकेनंतर या तिघांनाही मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टापुढे हजर केलं असता कोर्टाने या तिघांना सात दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिल देशमुख अचानक दोन दिवसांपूर्वी आर्थर रोड कारागृहातील स्वच्छतागृहात घसरून पडल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली. कारागृह प्रशासनाने त्यांची जे. जे. रुग्णालयात तपासणी केली. त्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे सीबीआय त्यांचा ताबा घेऊ शकली नाही.

मंगळवारी (5 एप्रिल) देशमुखांना डिस्चार्ज दिल्याने सीबीआय ताबा घेण्याआधीच देशमुखांनी त्याविरोधात हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. परंतु या याचिकेवरील सुनावणीआधीच सीबीआयने आर्थर रोड तुरुंगातून अनिल देशमुख यांना ताब्यात घेतले. आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना
11 एप्रिलपर्यंत CBI कोठडी देण्यात आली आहे.

Share This News

Related Post

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं छत्रपती शिवरायांना पत्र! काय लिहिलंय पत्रात… पाहा

Posted by - December 3, 2022 0
छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज किल्ले रायगडावर आक्रमक भाषण केलं. निर्धार शिवसन्मानाचा…

रक्तस्त्राव नाही ? मग सोमय्या यांना जखम कशामुळे झाली ? वैद्यकीय अहवाल आला समोर

Posted by - April 27, 2022 0
मुंबई – किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्या प्रकरणी महत्वाची अपडेट आलेली असून या हल्ल्यामध्ये सोमय्यांना जखम झाल्यावर रक्तस्त्राव झाला…
Dhananjay Munde

Dhananjay Munde : …तर मी राजकारण सोडून देणार; मराठा आरक्षणाबाबत धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य

Posted by - October 9, 2023 0
बीड : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजताना दिसत आहे. यादरम्यान आता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी…

MIT World Peace University : १२ व्या भारतीय छात्र संसदेचा उद्घाटन समारंभ

Posted by - September 14, 2022 0
पुणे : भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने…
Sangli News

Sangli News : सांगली हादरलं ! 2 नातवांनी आईसह मिळून केली आजीची हत्या

Posted by - February 22, 2024 0
सांगली : सांगलीमधून (Sangli News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये खानापूर तालुक्यातील पारे येथे जमिनीच्या वादातून 80 वर्षीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *