Ajit Pawar

Ajit Pawar : भुजबळांच्या बीडच्या सभेवर अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

682 0

पुणे : रविवारी बीडमध्ये अजित पवार (Ajit Pawar) गटाची सभा पार पडली. या सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी आपल्या मनातली सल बोलून दाखवली. भुजबळांच्या टीकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?
मला माईक सिस्टीममुळे भाषण ऐकायला आलं नाही. मी सोशल मीडियावर या बातम्या पाहिल्या. कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांच्याशी माझं बोलणं झालं नाही. राजकीय जीवनात आपली भूमिका मांडत असताना कोणाच्या भावना दुखवता कामा नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

बीडच्या सभेत छगन भुजबळ काय म्हणाले?
बीडच्या सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रवादीचं अध्यक्ष कोण? पक्ष कुणाचा? हे या सभेवरून स्पष्ट होतंय. जमलेला हा जनसागर अजितदादांसोबत आहे, असं छगन भुजबळ म्हणाले. ‘अगोदर माझ्या मतदारसंघात सभा घेतली, नंतर हसन मुश्रीफ आणि आता धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात, बारामतीमध्ये सभा घेतली की लगेच अजितदादा आमचे नेते, सुप्रिया सुळे आणि साहेबही म्हणतात. मग राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हीच जाहीर करून टाका. तुमच्याबरोबर भाषण करणाऱ्यांनी सह्या केल्या का नाही विचारा,’ अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

भुजबळ एवढ्यावरच थांबले नाहीतर तर त्यांनी ‘तुम्ही म्हणताय आम्ही घाबरलो म्हणून गेलो, मात्र तुम्ही विसरताय, काँग्रेसने तुम्हाला पक्षातून काढलं तेव्हा तुमच्यासोबत भुजबळ होता. विरोधी पक्षनेता असताना शिवसेना-भाजपला अंगावर घेतलं होतं. आम्ही तुमच्याबरोबर राहिलो, कशासाठी आमच्यावर हल्ले करत आहात? डबल मिनिंगचे जोक तुम्ही कधीपासून करायला लागले. धनंजय मुंडेंचा इतिहास तुम्ही काढला. ही अपेक्षा तुमच्याकडून नव्हती, बोलायला गेलं तर खूप आहे. 2003 ला तुम्ही माझा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला, काय कारण होतं, फक्त तेलगीबद्दल आरोप झाले. तुमच्यावरही आरोप झाले, पण तुमचा राजीनामा कुणी मागितला नाही,’ असे विधानदेखील छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

Share This News

Related Post

manoj-jarange-patil

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला अखेर यश ! पहाटेच्या सुमारास सरकारकडून अध्यादेश जारी

Posted by - January 27, 2024 0
मुंबई : मराठा आंदोलकांच्या आंदोलनाला अखेर यश (Maratha Reservation) आले आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य…

नाशिक पदवीधर निवडणूक: सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय

Posted by - February 3, 2023 0
नाशिक: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीला पराभव करत सत्यजित…
Akola News

Akola Crime : संपत्तीच्या वादातून काका-काकूकडून पुतण्याची हत्या

Posted by - September 2, 2023 0
अकोला : संपत्तीच्या वादातून कुटुंबातील एकाची हत्या केल्याची घटना अकोल्यातील (Akola Crime) पातूर तालुक्यातील भंडारज खुर्द याठिकाणी घडली आहे. मिलिंद…

5 राज्यांच्या निवडणुकांचे आज निकाल ; बहुमतासाठी किती जागांची आहे आवश्यकता ? वाचा सविस्तर

Posted by - March 10, 2022 0
देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर करण्यात येणार आहेत. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *