Ajit Pawar

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात संधी नाही? सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी प्रमुख नेत्यांच्या बैठकीला सुरुवात

445 0

नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून आज सायंकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनाचा शपथविधी समारोह पार पडणार असून महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाकडून नितीन गडकरी पियुष गोयल रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली असून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना देखील मंत्रीपदाची संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे.

रामदास आठवले हे देखील सलग तिसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेणार असून शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव हे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे माहिती मिळत आहे.

मात्र अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरकारमध्ये सहभाग होणार नसल्याची माहिती मिळत असून अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अद्याप मंत्रिपदासाठी फोन आला नसल्याची माहिती देखील आता समोर येत आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून प्रफुल पटेल यांचे नाव मंत्री पदासाठी चर्चेत होतं मात्र अद्यापही त्यांना मंत्रिपदासाठी फोन आला नाही याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक सुरू असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या बैठकीला उपस्थित असल्याचे माहिती मिळत असून दादा गटाची मनधरणी करण्याचा देवेंद्र फडणवीसांकडून प्रयत्न सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय

Share This News

Related Post

MP Tejasvi Surya : ” स्वातंत्र्यलढ्यात रा. स्व. संघाचं योगदान काय विचारणाऱ्यांनी भाजयुमोकडे शिकवणी लावावी ” VIDEO

Posted by - August 13, 2022 0
पुणे : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान काय असं विचारणाऱ्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाकडे शिकवणी लावावी, असं मत भारतीय…
CM EKNATH SHINDE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘अक्षय तृतीया’ ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा

Posted by - April 22, 2023 0
मुंबई: साडेतीन मुहूर्तांपैकी एक ‘अक्षय तृतीया’ अणि पवित्र अशा रमजान अर्थात ‘ईद-उल-फित्र’ या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा…
narayan rane

Loksabha Election : नारायण राणेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 7, 2024 0
तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक राजकीय बड्या नेत्यांनी सकाळी 8 वाजता बाहेर पडून आपल्या…
Narendra Modi Rally

भाजपच्या ‘मोदी @9’ जनसंपर्क अभियानाची ‘या’ 11 नेत्यांवर देण्यात आली जबाबदारी

Posted by - May 19, 2023 0
मुंबई : भाजपने (BJP) आगामी निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. मोदी सरकारला (Modi Government) देशात सत्तेत येऊन नऊ वर्ष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *