Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का ! सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनीदेखील सोडली साथ

410 0

पुणे : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.अजित पवारांचा निर्णय आपल्याला पटला नसल्याचं श्रीनिवास पवार म्हणाले आहेत. श्रीनिवास पवार अजित पवार यांच्यावर टीका केल्याने अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

नेमकं काय म्हणाले श्रीनिवास पवार?
मी नेहमीच अजितदादांसोबत राहिलो, चांगला काळ असेल, वाईट काळ असेल. त्यांनी जे काही निर्णय घेतले त्याला मी साथ दिली. मी त्यांना कधीही विचारलं नाही असं का केलं म्हणून. मात्र जेव्हा चर्चा झाली तेव्हा मी म्हणालो की जर आमदारकी अजितदादांकडे असेल तर खासदारकी मोठ्या साहेबांकडे असायला पाहिजे. त्यांचे अनंत उपकार आहेत. त्यांच्यामुळे सर्व पदं मिळाली आहेत. साहेबांचं वय आता 83 वर्ष झालं आहे, अशा स्थितीमध्ये त्यांना एकटं सोडणं मला पटत नाही. त्यांना आता तुम्ही घरी बसा, किर्तन करा असा सल्ला देणं दुर्दैवी आहे. आई -वडिलांनी जर आपल्या नावावर जमीन करून दिली तर आपण त्यांना सोडतो का? असा सवाल यावेळी श्रीनिवास पवार यांनी केला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले माझ्या काही मित्रांनी मला सांगितलं की आता इथून पुढचे वर्ष हे अजितदादांचे आहेत. मात्र ते मनाला पटलं नाही. काही औषधांना एक्सपायरी डेट असते, तसेच काही नात्यांना देखील एक्सपायरी डेट असते असं म्हणायचं अण् पुढे चालायचं असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kolhapur Accident : कोल्हापुरमध्ये भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने 4 जणांचा मृत्यू

Railway Accident : साबरमती -आगरा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा भीषण अपघात

वीरासन म्हणजे काय; काय असतात फायदे आणि काय काळजी घ्यावी?

Share This News

Related Post

Narayan Rane

Narayan Rane : भाजपमध्ये येण्याची ऑफर फडणवीसांनी कशी दिली? नारायण राणेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

Posted by - April 13, 2024 0
सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. प्रचाराची रणधुमाळीसुद्धा सुरु झाली आहे. सर्व नेत्यांकडून आरोप – प्रत्यारोप यांच्या फैरी सुरु…

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; 12 गंभीर जखमी

Posted by - April 25, 2023 0
पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात 12 गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मुंबईतून तेलंगणाच्या दिशेने…

#PUNE : कसबा विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे किरण कद्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Posted by - February 8, 2023 0
पुणे : आम आदमी पार्टीने उच्च शिक्षित, जनसामान्यात वावरणाऱ्या, कसबा विधासभेत ३० वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन आर्धी लढाई…

ढाल तलवार, रेल्वे इंजिन ते धनुष्यबाण; कसा आहे शिवसेनेच्या निवडणुक चिन्हाचा इतिहास

Posted by - October 9, 2022 0
मुंबई: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र आज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *