Ajit Pawar Speech

Ajit Pawar : CM शिंदेंच्या गाडीतून फोर्थ सीट प्रवास का केला? अजित पवारांनी केले स्पष्ट

444 0

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या एक व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा गाडीतील दाटीवाटीत बसलेला हा व्हिडीओ आहे. अजित पवार यांनी आज मुंबईतल्या अजित पवार गटाच्या महिला मेळाव्यात हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी या व्हिडिओवर भाष्य केले.

काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हायरल व्हिडीओत मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसलेल्या कारचालकाने काढल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालकाच्या बाजूच्या सीटवर येऊन बसताना दिसतात. मात्र शिंदे गाडीमध्ये बसण्याआधीच मागच्या सीटवर मध्यभागी चंद्रशेखर बावनकुळे बसलेले दिसत आहेत. त्यानंतर बावनकुळेंच्या उजव्या बाजूला देवेंद्र फडणवीस येऊन बसले. त्यानंतर डावीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार कारमध्ये शिरले. शेवटी मंत्री गिरीश महाजन हे अजित पवार यांच्या बाजूला बसण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अजित पवार अजून उजवीकडे सरकतात. मात्र आता एका बाजूने फडणवीस दुसरीकडून महाजन अशा स्थितीत मध्यभागी बावनकुळे आणि अजित पवार फोर्थ सीटवर बसल्याप्रमाणे अगदी दाटीवाटीने बसलेले दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना काय म्हणाले अजित पवार?
“पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये कोण कुणाच्या गाडीत बसणार, कुठे बसणार हे चेक होत असतं. पुढे गाडीचा चालक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर मागे मी स्वत:, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे बसणार होतो. पण ताफा एकदम पुढे गेल्याने आमचे मंत्रिमंडळातील सहकारी गिरीश महाजन यांना बसायला गाडी नसल्याने मीच त्यांना म्हटलं आपण दाटीवाटीने जाऊ. शेवटी आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही. एकमेकांना सांभाळून, एकमेकांना सोबत घेऊन जाणारी माणसं आहोत,” असे अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच जे व्हिडीओ व्हायरल करत आहेत त्यांची मला कीव करावीशी वाटते. विकासाचं बोलुयात ना आपण. गाडीत किती बसले, कोण बसले. अरे दाटीवाटीचा त्रास जे गाडीत बसले त्यांना होईल ना. तुम्हाला त्रास व्हायचं काय कारण आहे?” असाही सवालदेखील अजित पवार यांनी यावेळी विचारला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vishwas Tamhankar : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक विश्वास ताम्हणकर यांचे निधन

Navi Mumbai : मोबाईल वर बोलला आणि जिवानिशी मुकला! काय घडले नेमके?

Bhandara Video : आऊट ऑफ कंट्रोल झालेल्या बैलगाड्याने थेट आजोबांना उडवले; व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar : अजित पवारांचा फोर्थ सीटवरुन प्रवास! CM शिंदेंच्या कारमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता ‘हे’ काम होणार ऑनलाईन

Mumbai Highcourt : तुला जेवण बनवता येत नाही असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; हायकोर्टाने दिला निर्णय

Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

Nagpur News : नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप – लेकाचा मृत्यू

Mumbai -Pune Expressway : मुंबई -पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तासांचा घेण्यात येणार मेगाब्लॉक

Share This News

Related Post

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : नकली शिवसेना म्हणता ती तुमची डिग्री आहे का? उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

Posted by - April 12, 2024 0
पालघर : आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पालघरमध्ये जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर…

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढत ; शिवसेनेचे ‘ते’ 14 खासदार शिंदे गटाच्या मार्गावर

Posted by - July 18, 2022 0
मुंबई : शिवसेना हा आपलाच पक्ष आहे आणि त्यांचे चिन्हही आपलेच आहे,असा दावा करणाऱ्या शिंदे गटाकडून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर शक्ती…

Rain Update : शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

Posted by - July 15, 2022 0
पुणे : शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून पावसाचा जोर ओसरला आहे. आज खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी…
Thane

ब्रीजवरून पडलेली सळई गाडीच्या छतातून आरपार; थोडक्यात बचावला ड्रायव्हर (Video)

Posted by - June 5, 2023 0
ठाणे : सध्या मेट्रोची अनेक ठिकाणी कामे सुरु आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडी आणि अशा अनेक संकटांचा सामना…
Pune Mall

Pune Fire : पुण्यात फिनिक्स मॉलला लागली भीषण आग; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Posted by - April 19, 2024 0
पुणे : पुण्यातून आगीची (Pune Fire) आणखी एक घटना समोर आली आहे. पुणे शहराच्या मधोमध असणाऱ्या फिनिक्स मॉलला भीषण आग…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *