Maharashtra Political Crisis

Ajit Pawar : अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला मिळणार 11 खाती? संभाव्य यादी आली समोर

551 0

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह त्यांच्या एकूण 9 सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या गटाला संध्याकाळपर्यंत खातेवाटप केलं जाणार आहे. अजित पवार यांच्या गटाला ११ खाती दिली जाणार आहेत. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते सोपवण्याची दाट शक्यता आहे.

अजित पवारांकडे अर्थ किंवा महसूल खाते ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सध्या खाटेवाटपाची चर्चा सुरु आहे. अजित पवार आपल्या गटाला अधिक चांगली आणि अधिक खाती मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे अजित पवार गटाला कोणती खाती मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या गटाला अर्थ किंवा महसूल, महिला आणि बाल विकास, क्रीडा आणि युवक कल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय,वाहतूक, गृहनिर्माण, अल्पसंख्याक, वक्फ, सामाजिक न्याय आपत्ती व्यवस्थापन, मासेमारी वस्त्र मंत्रालय, मागास आणि बहुजन कल्याण, आणि पशुसंवर्धन ही 11 खाती देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Ajit Pawar : अजित पवारांसह राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते होते ईडीच्या रडारवर; मात्र आता सरकारमध्ये सामील

अजित पवार गटाकडे जाणारी मंत्रीपदे
अर्थ किंवा महसूल
महिला आणि बाल विकास
क्रीडा आणि युवक कल्याण
वाहतूक
गृहनिर्माण
अल्पसंख्याक आणि वक्फ
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय
मासेमारी, वस्त्र मंत्रालय
मागास आणि बहुजन कल्याण
सामाजिक न्याय आणि आपत्ती व्यवस्थापन
पशुसंवर्धन

अजित पवार गटाच्या नेत्यांना मिळणार ही खाती
दरम्यान, या खातेवाटपात धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय आणि आपत्ती व्यवस्थापन. हसन मुश्रीफ यांच्याकडे अल्पसंख्याक आणि वक्फ मंत्रालय . आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालविकास खाते जाऊ शकतं. तर छगन भुजबळ यांच्याकडे पूर्वीचंच अन्न आणि नागरीपुरवठा मंत्रालय जाण्याची शक्यता आहे. तर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे महत्त्वाचं खातं दिलं जाण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास लवकरात लवकर मंजूरी द्यावी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रधानमंत्र्यांकडे विनंती

Posted by - August 25, 2022 0
मुंबई : महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद असणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित असून त्यास लवकरात लवकर…

बंडानंतर एकनाथ शिंदे यांची आली पहिली प्रतिक्रिया, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत

Posted by - June 21, 2022 0
मुंबई -एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडानंतर आता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर राज्याचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी जवळपास 20 तासानंतर पहिली…

MAHARASHTRA POLITICS : धनुष्यबाण कोणाचा निर्णय नाहीच ! केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी दरम्यान आज काय घडले ? वाचा सविस्तर

Posted by - January 17, 2023 0
MAHARASHTRA POLITICS : धनुष्यबाण कुणाचा ? यावर आज महत्त्वाचा निर्णय होणार होता. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेले ही सुनावणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *