Ajit Pawar

Ajit Pawar : PM मोदींनी पुण्यातील सभेत शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

314 0

पुणे : पुण्यातील रेसकोर्स मैदानावर सोमवारी (दि.29) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामती, मावळ, शिरूर, पुणे या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये मोदींनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख करत शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. या टीकेवर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार?
महाराष्ट्र एका ‘भटकत्या आत्म्या’चा शिकार झाले आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे अशी टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत केली होती. मोदी यांच्या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना मी पुढच्या सभेत भटकती आत्मा कोण हे मी मोदींना विचारेन असं अजित पवार यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर कोणता उद्देश ठेवून ही टीका केली हे देखील मोदींना विचारेन असं अजित पवार म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?
पंतप्रधान मोदींनी पुण्यातील भाषणामध्ये शरद पवारांवर निशाणा साधला. “महाराष्ट्राने दिर्घकाळ राजकीय अस्थिरतेचा काळ पाहिला आहे. मी जे बोलतोय ते कोणी व्यक्तिगत घेऊ नका. आमच्याकडे म्हणतात काही भटकत्या आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांची स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्या आत्मा भटकत राहतात. स्वत:चं नाही झालं तर इतरांचं बिघडवण्यात त्यांना मजा येते. आपला महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांना बळी पडला आहे. 45 वर्षांआधी येथील एका मोठ्या नेत्याने आपल्या महत्त्वकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली,” असं म्हणत मोदींनी थेट उल्लेख न करता शरद पवारांवर निशाणा साधला. “तेव्हापासून (मागील 45 वर्षांपासून) महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु आहे. अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत. ही आत्मा काहीही करते. विरोधकांनाही तिने अस्थिर केलं आहे. ही आत्मा आपल्या पक्षाला आणि कुटुंबालाही अस्थिर केलं आहे. 1995 महायुती सरकारवेळीही या आत्माने सरकारला अस्थिरत करण्याचा प्रयत्न केला,” असंही मोदी म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rules Change From 1st May 2024: सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री; 1 मेपासून ‘या’ नियमांत होणार बदल

Rohit Pawar : शरद पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर

Loksabha Election : मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

Patanjali Products Ban : पतंजलीच्या ‘या’ 14 प्रोडक्टवर घालण्यात आली बंदी

Nashik Accident : नाशिकमध्ये ST बसचा भीषण अपघात

Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Share This News

Related Post

वनवे,रॉंग टर्न…! बिनधास्त तोडा वाहतुकीचे नियम; दिवाळीमध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालकमंत्र्यांचा अजब निर्णय

Posted by - October 19, 2022 0
पुणे : सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी पुणेकर मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. त्यामुळे बाजारपेठेकडे जाणारे रस्ते प्रचंड जाम होत आहेत. पुण्यामध्ये…
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवार यांना ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट

Posted by - April 26, 2024 0
मुंबई : राज्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिलासा देणारी बातमी समोर आली…

Decision of Cabinet meeting : ‘या’ 3 नवीन समाजकार्य महाविद्यालयांना मान्यता

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : राज्यात 3 नवीन समाजकार्य महाविद्यालयांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.…
Pune News

Pune Porsche Accident : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! विशाल अग्रवाल प्रकरणात केल्या ‘या’ 4 मोठ्या कारवाया

Posted by - May 25, 2024 0
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये (Pune Porsche Accident) रविवारी रात्री बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने म्हणजेच वेदांत अग्रवालने दारूच्या…
Yerwada Jail

Pune Crime : पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्याची निर्घृणपणे हत्या

Posted by - December 29, 2023 0
पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात (Pune Crime) मागच्या काही दिवसांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *