Rohit Pawar

रोहित पवारांकडून मध्यरात्रीच अहिल्यादेवी यांची जयंती साजरी

487 0

पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar) यांच्या जयंतीवरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. आज सकाळी साडेपाच वाजता शासकीय कार्यक्रमांना सुरुवात होणार होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मध्यरात्रीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाला सुरुवात केली. त्यामुळे आता राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणी अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता त्यांनी आपल्याला याबाबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आज (बुधवारी) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) , केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, इंदूरच्या होळकर संस्थानांचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या जयंतीनिमित्त सकाळी पाच वाजता येथील महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात आला.

मात्र या अगोदर रोहित पवार यांनी काल मध्यरात्रीच पूजा करुन मिरवणूक काढली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कर्मभूमीतून उज्जैन येथून आणलेल्या हत्तीची चौंडीमध्ये पूजा करण्यात आली. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाची माहिती रोहित पवार यांनी फेसबुकवरून दिली आहे.

Share This News

Related Post

LokSabha

Lok Sabha Election : देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; 21 राज्य, 102 मतदारसंघ; कुठे होणार काँटे की टक्कर?

Posted by - April 19, 2024 0
मुंबई : बहुप्रतिक्षित अशा लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज देशभरात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्यांमध्ये मतदान होणार आहे.…

रद्दी विक्रीतून केंद्र सरकारनं केली 63 कोटी रुपयांची कमाई !

Posted by - March 16, 2023 0
Edited By : रश्मी खेडीकर : मोदी सरकारने वेगळ्या प्रकारचे स्वच्छता अभियान राबवले असून यामधून सरकारला तब्बल ६३ कोटी रुपयांचा…

श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गणेशभक्तांची मोठी गर्दी

Posted by - January 1, 2023 0
पुणे – नवीन वर्षाचे स्वागत करताना नवे संकल्प घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक होण्याकरता गणेश भक्तांनी रविवारी सकाळपासूनच…
Maharashtra Weather

Maharashtra Weather Update : पुढील 24 तास खूप महत्वाचे; हवामान विभागाने जारी केला नवा अलर्ट

Posted by - June 14, 2024 0
मुंबई : मान्सूनची महाराष्ट्रात (Maharashtra Weather Update) दमदार वाटचाल सुरू आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान आज पुन्हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *