BJP Logo

विधानसभेपूर्वी भाजपाकडून मराठा समाजाचा रोष कमी करण्याचा प्लॅन; पाहा राज्यसभेसाठी ‘ह्या ‘नेत्यांना मिळणार उमेदवारी?

136 0

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील दोन रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून, महाराष्ट्रातून रावसाहेब दानवे यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मोठा फटका हा महायुतीला बसला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 23 खासदार निवडून आलेल्या भाजपाला 2024 च्या निवडणुकीत केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे मराठा समाजाला खुश करण्यासाठी आता भाजपा रावसाहेब दानवे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी पराभव केला. पराभव झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी मराठवाडा आणि महाराष्ट्रात पक्ष संघटनेच्या कामाला सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीत जनतेने मला नाकारलं आहे त्यामुळे मला विधानसभा विधानपरिषद आणि राज्यसभा ही नको अशी भूमिका रावसाहेब दानवे यांनी घेतल्याचे सांगितलं जातंय. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी रावसाहेब दानवे यांना विचारणा करण्यात आली होती परंतु त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. राज्यातील मराठा समाजासह मोठं नेतृत्व असणारा रावसाहेब दानवे यांचं राजकीय पुनर्वसन होणे गरजेचे आहे त्यामुळे भाजपमधून त्यांना राज्यसभेवर संधी दिल्या जाऊ शकते, त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा हा पक्षाला होईल आणि त्याचबरोबर मराठा मतदारांना आकर्षित करण्याची आणि मराठा समाजाचा भारतीय जनता पक्षाबद्दल असलेला रोष कमी करण्याची योजना असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Share This News

Related Post

Raj Thackeray

सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न, पण..’; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सरकारला खडे बोल

Posted by - August 21, 2024 0
बदलापूरमध्ये चार वर्षीय दोन विद्यार्थिनींवर सफाई कर्मचाऱ्याने शाळेच्या शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला…

अशा लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही ! केतकी चितळेला राज ठाकरे यांनी सुनावले !

Posted by - May 14, 2022 0
मुंबई- अभिनेत्री केतकी चितळेच्या शरद पवार यांच्याशी संबंधित असलेल्या पोस्टवरून सध्या राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार यांच्यावर…

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभेची तयारी सुरू; 100 मतदारसंघात नेमले निरीक्षक

Posted by - August 6, 2024 0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्षाने विधानसभेची तयारी सुरू केली असून या अनुषंगाने शंभर विधानसभा मतदारसंघात निरीक्षकांच्या नेमणुका केल्याची माहिती…

संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामिनावर 19 मे रोजी निर्णय

Posted by - May 17, 2022 0
मुंबई- मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी आज पूर्ण झाली आहे. 19 मे रोजी मुंबई…
Narendra Modi

Narendra Modi : जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका!

Posted by - April 20, 2024 0
गरीबीची कुचेष्टा आणि गरीबांची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसने जनतेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. त्यांच्या इंडीया आघाडीतील पक्षांचा परस्परांवर विश्वास नाही, त्यामुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *