प्रगती आणि विकासाच्या मार्गावर नेणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा विश्वास

367 0

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाला प्रगती आणि विकासाच्या मार्गावर नेणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असा विश्वास भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.

मुळीक म्हणाले, आयकरात मोठी सवलत दिल्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक केली जाणार असल्यामुळे पुण्यासारख्या शहरात मूलभूत सुविधांसाठी मोठा निधी उपलब्ध होईल. त्यामुळे उद्योग निर्मितीला चालना मिळेलउद्योग निर्मितीला चालना मिळेल.

मुळीक म्हणाले, युवकांसाठी स्टार्टअपच्या विविध योजना मांडण्यात आल्या आहेत. त्याबरोबर लघु उद्योगातून रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

मुळीक पुढे म्हणाले, महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. एससी, एसटी आणि ओबीसी समाजाच्या योजनांना भरपूर निधी दिला आहे. त्यामुळे सर्व समाज घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प आहे. मी त्याचे मनापासून स्वागत करतो.

Share This News

Related Post

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची‌ सरपंचांसोबत ‘लंच पे चर्चा’ ; गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची सूचना

Posted by - January 27, 2023 0
पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आपल्या नियोजित कार्यक्रमानंतर ‘लंच पे चर्चा’ च्या माध्यमातून सरपंचांशी संवाद साधला. गावच्या विकासासाठी…
Top News Marathi Logo

मोठी बातमी! सुरतकडे जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांनी अडवलं

Posted by - April 3, 2023 0
गुजरात: काँग्रेस नेते राहुल गांधी आज सुरत न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार असून राहुल गांधी स्वतः सुरत न्यायालयात हजर राहणार आहेत…

17 सप्टेंबर… मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विशेष !

Posted by - September 17, 2022 0
भारत स्वतंत्र झाल्यानंतर तीन संस्थानं या स्वतंत्र भारतात सामील झालेली नव्हती. त्यापैकीच एक म्हणजे मराठवाडा ! स्वतंत्र भारतात विलीन होण्यासाठी…
Offensive Video

Offensive Video : अश्लील व्हिडिओमुळे भाजपाच्या ‘या’ नेत्याचं संपलं आहे राजकीय करिअर

Posted by - July 18, 2023 0
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडिओ (Offensive Video) सध्या व्हायरल होत असून या व्हायरल व्हिडिओवरून (Offensive Video)…

“सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन ताकदीनिशी उभे राहणार !” विधानसभेत ठराव एकमताने मंजूर

Posted by - December 27, 2022 0
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू झाल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद या प्रश्नावर ठराव आणण्याची मागणी होत होती.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *