50 खोकी हा विषय केवळ रवी राणांच्या दिलगिरीचा नाही, 50 कोटी प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी व्हावी : आम आदमी पार्टी

268 0

आज बीजेपी आमदार रवी राणा यांनी माफी मागितली आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, या सरकारचे समर्थक आमदार बच्चू कडू व रवी राणे अशी चर्चा झाल्याचे समजते. हे सर्व सत्ताधारी बाकांवरील आमदार आहेत. दोघांमधील वाद चव्हाट्यावर येण्यास कारण ठरलंय गुवाहाटी आणि खोके. रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर टीका करताना ५० खोके घेतल्याचा आरोप केला आहे. बच्चू कडूंनी शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला आहे. रवी राणांनी केलेल्या आरोपांवर सुरूवातीला बच्चू कडूंनी मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे), उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) यांनाही यात भूमिका मांडण्याचं आवाहन केलं होतं.

खरे तर हा प्रश्न जनतेच्या पैशाचा आणि मतदारांच्या अपेक्षांभंगाचा आहे. हे सर्व फुटीर आमदार कोणत्या आमिषाला बळी पडले आहेत असा जनतेच्या मनात प्रश्न आहे. केला गेलेला आरोप हा तब्बल पन्नास कोटींचा आहे आणि शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांची संख्या पाहता ही रक्कम प्रचंड मोठी होते. हा गंभीर आरोप फक्त च्या दोघांमध्ये मिटवण्याचा नसून याची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. या आरोपाची चौकशी ईडी- सीबीआय मार्फत करायला हवी अशी मागणी आम आदमी पार्टीचे राज्यात अध्यक्ष रंगा राचुरे यांनी केली आहे.

Share This News

Related Post

विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन बँक, गुड टच-बॅड टचचे शिक्षण ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा उपक्रम

Posted by - September 28, 2022 0
पुणे : ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन बँक, गुड टच – बॅड टचचे शिक्षण देणारा उपक्रम महाराष्ट्र…
Manoj Jarange

Maratha Reservation : मराठा पुन्हा एकवटणार; मनोज जरांगे यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Posted by - March 9, 2024 0
बीड : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. सरकारनं मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाला मंजुरी दिली.…

ROHIT PAWAR : “जनतेचे प्रश्न सोडवण्या ऐवजी सत्ताधारी आमदार पायऱ्यांवर आंदोलन करतात; हेच का जनसामान्यांचे भरकटलेलं दिशाहीन सरकार ? रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Posted by - December 22, 2022 0
नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. दिशा सालियान…
Banner

Ajit Pawar : ‘साहेब दादांना सीएमपदासाठी आशिर्वाद द्या’; बारामतीत झळकले बॅनर

Posted by - November 13, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या…

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ५ दिवस परवानगी

Posted by - August 17, 2022 0
पुणे : सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान चार ऐवजी ५ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *