Eknath Shinde thane

राष्ट्रवादीला मोठा धक्का ! गोंदियाच्या नगराध्यक्षांसह 15 नगरसेवक शिंदे गटात दाखल

832 0

ठाणे : महापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राष्ट्रवादी (NCP) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या गोंदियातील नगराध्यक्षासह 15 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे गोंदियात शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या सर्वांच्या अंगावर भगवा शेला टाकत त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे गोंदियातील (Gondia) दोन नगराध्यक्ष, 15 नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महिला कार्यकर्त्याही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या पक्षप्रवेशामुळे गोंदियात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. सडक अर्जुनी नगर पंचायत आणि अर्जुनी नगरपंचायतमधील (Arjuni Nagar Panchayat) 15 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे. तसेच दोन बांधकाम सभापती आणि बाकी वॉर्ड सदस्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Share This News

Related Post

Dhananjay Munde And Sharad Pawar

Dhananjay Munde : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना परळीत मोठा धक्का ! मुंडेंचे ‘हे’ खंदे समर्थक जाणार शरद पवार गटात

Posted by - August 17, 2023 0
बीड : कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना परळीत मोठा धक्का बसला असून मुंडे (Dhananjay Munde) यांचे खंदे समर्थक बबन…
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : ‘तुमच्या डोक्यात लोचा झाला…’, ‘त्या’ पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंवर पलटवार

Posted by - January 25, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात महाविकासआघाडीच्या नेत्यांची (Prakash Ambedkar) मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीसाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे…
Mumbai Pune Highway

Mumbai – Pune Highway : पुण्यावरुन मुंबईला येणारी वाहतूक आज दुपारी होणार बंद ; काय आहे नेमके कारण?

Posted by - July 24, 2023 0
लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai – Pune Highway) आज 2 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी 12…

‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या कार्यशाळेचे उद्घाटन

Posted by - October 18, 2022 0
पुणे : मिशन वात्सल्यअंतर्गत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व सुधारित अधिनियम २०२१ तसेच ‘कारा’ दत्तक नियमावली…

दुःखद बातमी : शिरूरचे माजी आमदार बाबुराव पाचरणे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

Posted by - August 11, 2022 0
शिरूर : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबुराव पाचरणे यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *