कात्रज कोंढवा रस्त्यासाठी 140 कोटींचा निधी; रस्त्याच्या कामाला गती महानगरपालिकेवर अतिरिक्त खर्चाचा भार

2802 0

पुणे: कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाची घोषणा अनेक दिवसांपूर्वी झाली होती. मात्र या कामासाठी भूसंपादनासाठी अनेक अडथळे निर्माण होत होते. मात्र आता कुठेतरी या कामाला गती येण्याची चिन्ह दिसत आहेत. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी वर्षभराच्या कालावधीनंतर एकूण खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच 139.83 कोटी रुपये निधी देण्याचा आदेश देण्यात आला.

 

या रस्त्याच्या कामाची पाहणी अनेक मोठ्या नेत्यांनी केली होती. त्याचबरोबर रस्त्याच्या कामासाठी 200 कोटी रुपये राज्य सरकारने द्यावेत अशी मागणी महानगरपालिकेतर्फे करण्यात आली होती. त्यावर पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विद्यमान पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या रस्त्याच्या कामासाठी 200 कोटी रुपये देऊ असे सांगितले होते. मात्र हा निधी अद्यापही देण्यात आला नव्हता पण अखेर शुक्रवारी या संदर्भातला आदेश काढण्यात आला. यानुसार या कामासाठी 139.83 कोटी रुपये महापालिकेला वर्ग केले जाणार आहेत. पण एकूण 200 कोटी निधीतील केवळ 139.83 कोटीचा निधी दिला जाणार असल्यामुळे उर्वरित साठ कोटी रुपये पुणे महानगरपालिकेला द्यावे लागतील. त्यामुळे या अतिरिक्त साठ कोटींचा भार पुणे महानगरपालिकेवर पडणार आहे.

 

कात्रज कोंढवा भागात वाढलेल्या लोकसंख्येमुळे या भागात वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात होते. ज्यावर उपाय म्हणून या रस्त्याचे 84 मीटर रुंदीकरणाचे काम करण्याचा महानगरपालिकेचा विचार होता. मात्र या कामात भूसंपादन करण्यासाठी अनेक अडथळे आल्याने या रस्त्याचे रुंदीकरण 50 मीटर पर्यंत कमी केले गेले. मात्र यानंतरही अनेक जागा मालकांनी भूसंपादनाच्या बदल्यात मिळणारा मोबदला रोख रकमेच्या स्वरूपात द्यावा अशा प्रकारची मागणी केल्यामुळे हे काम अनेक वर्ष रखडले होते. मात्र निधी अभावी रखडलेले हे काम येत काही दिवसात सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. असे झाल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होईल असे स्थानिकांचे आणि महानगरपालिका प्रशासनाचे मत आहे.

Share This News

Related Post

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी स्थापन केली संघटना; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

Posted by - May 9, 2022 0
मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवी संघटना स्थापन केली असून या संघटनेचे एसटी कर्मचारी जनसंघ…

Mumbai Pune Express Highway Traffic Jam : सलग सुट्ट्यांमुळे फिरायला जाण्याचा प्लान करताय ? तर ही बातमी वाचाच …

Posted by - August 13, 2022 0
पुणे : शनिवार , रविवार आणि 15 ऑगस्ट अशा सलग सुट्ट्या आल्यामुळे नोकरदार वर्गाने फिरायला जाण्याचा प्लॅन नक्कीच केला असणार…
Amol Kolhe

Amol Kolhe : शिवाजीराव आढळराव पाटलांकडून पैसेवाटप होण्याची शक्यता; प्रतिस्पर्धी उमेदवार अमोल कोल्हे यांनी दिलं निवडणूक आयोगाला पत्र

Posted by - May 10, 2024 0
शिरूर : महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी मतदानाच्या…

#Informativ : विधान परिषद आणि विधानसभा यात नेमका फरक काय आहे ? जाणून घ्या सविस्तर माहिती

Posted by - March 10, 2023 0
संसंदीय लोकशाहीची दोन सभागृह कोणती…? आपल्याला हे तर माहीतीच आहे की लोकसभेत खासदार तर विधानसभेत आमदार निवडून जातात. पण ह्या…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर; युवा पुरस्कार प्राजक्ता माळी, प्रियेशा देशमुख, रणजित काशिद, अमोल वाघमारे यांना जाहीर

Posted by - January 27, 2023 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी प्रजासत्ताक दिनाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *