लता मंगेशकर का राहिल्या आजीवन अविवाहित ? वाचा अधुरी एक प्रेम कहाणी

738 0

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मागील दिवसांपासून त्या ब्रीच कँडी उपचार घेत होत्या. अखेर आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक अशी महत्त्वाची घटना आहे, ज्याचा त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम झाला.

लता मंगेशकर यांचे लग्न झालेले नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आजपर्यंत त्यांनी लग्न का केलं नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊन गेला असेल.

त्यामागची कहाणीही अतिशय हृदयद्रावक आहे. लतादीदींबद्दल असं म्हटलं जातं की त्याही कुणाच्यातरी प्रेमात पडल्या होत्या, पण लताजींची प्रेमकहाणी कधी पूर्णच होऊ शकली नाही. कदाचित याचमुळे त्या आजन्म अविवाहित राहिल्या.

लता मंगेशकर यांचे डूंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह यांच्यावर खूप प्रेम होते. एवढेच नाही तर लतादीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर हेही महाराजांचे मित्र होते. मात्र, हे प्रेम लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही.

दोघांच्या प्रेमात राजघराणं आलं. सामान्य घरातील कोणत्याही मुलीला आपल्या घरची सून करणार नाही, असं वचन राज यांनी आपल्या पालकांना दिल्याचं सांगितलं जातं. हे वचन राज यांनी मरेपर्यंत पाळलं.
त्याचवेळी, लतादीदींवरही त्यांच्या संपूर्ण घराची जबाबदारी होती, म्हणूनच त्यांनीही पुढे जाऊ कधी लग्न केलं नाही. पण लतादीदींप्रमाणे राजही आयुष्यभर अविवाहित राहिले.

Share This News

Related Post

#PUNE : शिवाजी नगर व विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत पार्कींगबाबत आदेश निर्गमित

Posted by - March 3, 2023 0
पुणे : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्यादृष्टीने शिवाजीनगर वाहतूक विभाग आणि विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत पार्किंगबाबत काही अंतिम आदेश…
Raosaheb Danve

Manoj Jarange : ‘जर जरांगे पाटील विधानसभेला उभे राहिले तर…’, रावसाहेब दानवेंनी केले मोठे वक्तव्य

Posted by - May 19, 2024 0
पंढरपूर : जर ओबीसीमधून आरक्षण मिळालं नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मैदानात उतरणार असल्याची मोठी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे…

PHOTO : ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ ; अमित ठाकरे यांनी राबवली चौपाटीवर स्वछता मोहीम

Posted by - September 10, 2022 0
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत सक्रिय सहभाग…

Breaking News ‘चित्रा वाघ यांनी जबाब द्यायला भाग पाडलं’, रघुनाथ कुचिक प्रकरणी पीडितेचा धक्कादायक दावा

Posted by - April 12, 2022 0
पुणे- रघुनाथ कुचिक प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. या प्रकरणातील पीडितेने खळबळजनक खुलासा केला आहे. चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे विशिष्ट…

राज्यात ऑक्टोबरमध्ये २१ हजार बेरोजगार उमेदवारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Posted by - November 18, 2022 0
मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *