फेक कॉल करणाऱ्यांनो सावधान ! आता तुमचे नाव लपून राहणार नाही !

232 0

नवी दिल्ली- जेंव्हा अननोन नंबरवरून कॉल आला की तुमच्या स्क्रीनवर फक्त त्याचा नंबर दिसतो. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांचे चांगलेच फावते. मात्र आता कोणीही अनोळखी व्यक्तीने तुम्हाला फोन केला तरीही त्याचे नाव स्क्रीनवर झळकणार आहे. याबाबत भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण (ट्राय) नवे तंत्रज्ञान विकसित करण्याचा विचार करीत आहे.

ट्राय लवकरच फोन स्क्रीनवर कॉलर्सची KYC Based नावे फ्लॅश करण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू करणार आहे. ट्रायचे हे तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर तुम्हाला फोनवर युजर्सचे KYC नाव देखील दिसेल. नवे तंत्रज्ञान तयार करण्याकरिता येत्या दोन महिन्यांत हालचाली सुरू करण्यात येतील.

ही नवीन केवायसी आधारित प्रक्रिया दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार असेल. KYC आधारित प्रक्रिया कॉलर्सना त्यांच्या KYC नुसार ओळखण्यात मदत करेल. या प्रक्रियेत दूरसंचार कंपन्यांना सर्व ग्राहकांचे अधिकृत नाव, KYC नावाने पत्ता प्रविष्ट करावा लागेल. याशिवाय, मतदार ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना किंवा वीजबिलाची पावती कागदपत्र म्हणून द्यावी लागणार आहे. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी होईल. नवीन KYC आधारित प्रक्रिया लागू झाल्यानंतर कॉलर आपली ओळख लपवू शकणार नाही.

याबाबत बोलताना ट्रायचे अध्यक्ष पी. डी. वाघेला म्हणाले, ” हे तंत्रज्ञान विकसित करण्याची सूचना केंद्रीय दूरसंचार खात्याकडून आम्हाला करण्यात आली होती, दूरसंचार खात्याने आखून दिलेल्या नियमांच्या कक्षेत राहून तसेच दूरसंचार कंपन्यांनी नोंदविलेल्या केवायसीचा आधार घेऊन नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात येईल. दूरध्वनी करणाऱ्यांची नावे मोबाइलच्या स्क्रीनवर दर्शविणाऱ्या काही ॲपपेक्षा ट्रायचे नवे तंत्रज्ञान अधिक उत्तम व पारदर्शक असेल. ट्रायच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे स्वत:च्या मर्जीवर अवलंबून असेल की, सर्वांनाच त्याचा वापर करावा लागेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही अशी माहिती वाघेला यांनी दिली.

Share This News

Related Post

अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या घटनेचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून निषेध (व्हिडिओ)

Posted by - March 26, 2022 0
पुणे- शिवाजीनगर येथील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नराधम…

रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय? 

Posted by - July 14, 2022 0
अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड…
Gautami Patil

Gautami Patil : मराठा आरक्षणाबाबत गौतमी पाटीलने केले ‘हे’ मोठे वक्तव्य

Posted by - December 13, 2023 0
पुणे : मराठा आरक्षणावरून सध्या राज्याचे राजकारण पेटले आहे. मराठा आरक्षणावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला…

कुख्यात गुंड गजा मारणे ची नागपूर कारागृहातून सुटका

Posted by - March 7, 2022 0
नागपूर कारागृहात स्थानबद्ध असलेल्या पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे ची कारागृहातून सुटका झाली आहे.गजा मारणेला एमपीडीए कायद्यान्वये एक वर्ष स्थानबद्ध…

मराठीमधील सर्वात बोल्ड वेबसिरीज ‘रानबाजार’चा ट्रेलर प्रदर्शित, २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला (व्हिडिओ)

Posted by - May 19, 2022 0
मुंबई- काही दिवसांपूर्वी अभिजित पानसे लिखीत, दिग्दर्शित ‘रानबाजार’ या बिग बजेट वेबसीरिजचे टिझर सोशल मीडियावर झळकले होते. त्यानंतर प्रेक्षकांच्या मनामध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *