पंतप्रधान मोदींचा दिव्यांग मुलांसोबत तिकीट काढून पुणे मेट्रो प्रवास

215 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले. या उदघाटन सोहळ्यात त्यांनी चक्क दिव्यांग मुलांसोबत प्रवास केला. त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचे अनावरण केल्याच्या कार्यक्रमानंतर ते पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी रवाना झाले.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

पुणे मेट्रोचे एकूण अंतर हे 32.2 किलोमीटर आहे.आपल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 किलोमीटरच्या पट्ट्यात प्रवास केला. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधानांनी तिकीट खरेदी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोचा प्रवास गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर असा केला. यावेळी त्यांच्यासोबत दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्यासोबत त्यांनी गप्पा मारल्या. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती आपल्यासोबत अशी गप्पा मारते, हे पाहून विद्यार्थीही भारावून गेले.

https://youtu.be/bMxGXw43H2g

Share This News

Related Post

अपघातानंतर खासगी ट्रॅव्हल्स बस पेटली, ७ जणांचा मृत्यू तर १३ जखमी, कलबुर्गी येथील घटना

Posted by - June 3, 2022 0
कलबुर्गी- खासगी ट्रॅव्हल्स बस आणि टेम्पो ट्रॅक्समध्ये झालेल्या धडकेनंतर बसने पेट घेतल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या सात जणांचा…
Pune Accident

Pune Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर पुन्हा अपघात; वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू

Posted by - August 14, 2023 0
पुणे : कात्रज – कोंढवा रोड गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचा (Pune Accident) सापळा बनला आहे. या ठिकाणी अपघाताचे (Pune Accident)…

होळीसाठी हेअर केअर टिप्स : रंग खेळताना केसांची अशी घ्या काळजी

Posted by - March 7, 2023 0
होळी खेळण्याचा बेत आखला आहे, पण होळीनंतर जेव्हा रंगापासून सुटका होते, तेव्हा ती अशी बनते. त्यामुळे होळी खेळल्यानंतरही तुमचे केस…
Water Supply

Pune Water Supply : पुणेकरांना दिलासा ! पुणे शहरातील पाणी कपात रद्द

Posted by - July 29, 2023 0
पुणे : पुणेकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज आढावा…

VIDEO : पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीयपंथी महिलांच्या हस्ते आरती… पाहा

Posted by - September 3, 2022 0
पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपात मंगलमूर्ती तृतीयपंथी चॅरिटेबल ट्रस्टच्या तृतीयपंथी महिला सदस्यांनी आरती केली. गणेशोत्सव काळात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *