Tourism Minister Mangalprabhat Lodha : पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शासन आणि पर्यटन क्षेत्रातील भागधारकांचे सहकार्य घेणार

357 0

पुणे : पुणे जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून शासन आणि या क्षेत्रातील भागधारक यांच्या संयुक्त प्रयत्नातून पर्यटनाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबवण्यात याव्यात, असे निर्देश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पर्यटन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पर्यटन विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांच्यासह पर्यटन क्षेत्रात कार्यरत यात्रा व्यवस्थापक (टूर ऑपरेटर्स), हॉटेल असोशिएशन, टूरिस्ट गाईड्स यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. लोढा म्हणाले, पुणे जिल्ह्यात शिवनेरी, सिंहगड यासारखे गडकिल्ले, भिगवण पक्षी निरीक्षण केंद्र आणि जुन्नर द्राक्ष महोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव यासारखे विविध उपक्रम पर्यटकांना आकर्षित करतात. याच बाबीचा विचार करता पर्यटक क्षेत्राचा विकास करण्यासाठी जिल्ह्यातील खाजगी पर्यटन क्षेत्रात कार्यरत विविध कार्यरत असणाऱ्या संघटनेची मदत घेऊन समिती स्थापन करावी.

पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा शासनाचा मानस आहे. यादृष्टीने या क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्थांना शासनाच्यावतीने आवश्यक ती मदत केली जाईल. समितीच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्र विकसित करण्याच्यादृष्टीने नवनवीन कल्पना सूचविण्यास मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.

पुणे जिल्ह्यात पर्यटन विकासाच्यादृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती सहायक संचालक श्रीमती करमरकर यांनी दिली. यावेळी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले विचार मांडले.

Share This News

Related Post

दसऱ्याला कुलदेवीची अशी भरा ओटी ! योग्य पद्धत आणि धर्मीकी महत्व

Posted by - October 3, 2022 0
दसऱ्याच्या दिवशी कुलदेवीची ओटी भरण्याची प्रथा अनेक घरांमध्ये असतेच. देवीची ओटी भरत असताना काही महत्त्वाच्या बाबी नेहमी लक्षात ठेवाव्यात ज्यामुळे…

ह्या कारणामुळे नीना गुप्ता यांनी ‘वध’ चित्रपट करण्यास दिला होकार; निर्मात्यांनी शेअर केला चित्रपटाचा BTS व्हिडिओ

Posted by - December 4, 2022 0
बहुप्रतिक्षित आगामी क्राईम थ्रिलर ‘वध’ या चित्रपटात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांना पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये पाहायला मिळणार असल्याने याची…
Vinod Tawde

विनोद तावडे यांच्या खांद्यावर पुन्हा मोठी जबाबदारी; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या समितीत झाला समावेश

Posted by - March 30, 2024 0
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून नुकतीच जाहीरनामा समितीची घोषणा करण्यात आले असून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या…
Pune News

Pune News : धक्कादायक! चौथ्या मजल्यावरुन कोसळून तरुणाचा मृत्यू; पुण्यामधील घटना

Posted by - July 6, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये (Pune News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 13 वर्षीय मुलाचा चौथ्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू…

बहीण म्हणून वसंत मोरेंच्या पाठीशी, रुपाली पाटील यांच्याकडून पाठराखण

Posted by - April 6, 2022 0
पुणे – राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या भूमिकेनंतर पुण्यातील मनसेच्या स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *